ओला कॅबमधून घेऊन जाताना एका चालकाने महिलेसमोर हस्तमैथून केल्याची घटना समोर आली आहे. संबधित महिलेने आरडाओरड केल्यानंतर तो पळून गेला. पोलिस संबधित चालकाचा शोध घेत असून कंपनीने चालकाला निलंबित केले आहे.
संबधित महिला पत्रकार असून तिने आपल्या सोशल मीडियावर पोस्ट लिहिले आहे. ज्या महिला पत्रकारासोबत ही धक्कदायक घटना घडली, त्याबाबत तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, 'ज्या शहराला मी माझं घर म्हणते, तिथे आज मला असुरक्षित असल्याचं जाणवलं. काम संपवून मी घरी येत होते, तेव्हा ओला कॅबचा वाहन चालक माझ्या समोरच हस्तमैथुन करत होता.
त्याला असं वाटत होतं की, माझं त्याच्याकडे लक्ष नाही. नंतर तो असं भासवू लागला की, तो काही चुकीचं करत नाही. त्याचवेळी मी आरडाओरडा करायला सुरुवात केली. तेव्हा त्याने कॅब थांबवली. माझं दुर्दैव असं की कॅब तेव्हा अंधाऱ्या रस्त्यावर होती. कॅब थांबवल्यावर मी कॅबमधून उतरले आणि वाहन चालकाने पळ काढला. नशीब चांगलं म्हणून मला थोड्या वेळातच दुसरी कॅब मिळाली.'
बेंगलोरचे पोलीस आयुक्त कमल पंत यांनी या घटनेबद्दल खेद व्यक्त केला. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांची एक पथक पाठवण्यात आले असून आरोपीला लवकर अटक करू, असे त्यांनी संबधित महिलेच्या ट्विटला रिप्लाय दिला आहे. ओला कंपनीने महिला पत्रकाराच्या तक्रारीची दखल घेत तिची माफी मागितली आहे. तसेच संबंधित चालकावर कारवाई करण्यात आल्याची माहिती दिली आहे.
हेही वाचा :