Odisha Man Dies After Wife Hits With Mobile Pudhari
राष्ट्रीय

Crime News: कौटुंबिक वादाचा रक्तरंजित शेवट; रागाच्या भरात पत्नीने मोबाईल डोक्यात मारला, पतीचा उपचारादरम्यान मृत्यू

Odisha Man Dies After Wife Hits With Mobile: ओडिशातील बोलांगीर जिल्ह्यात घरगुती वादादरम्यान पत्नीने पतीच्या डोक्यात मोबाईल मारल्याचा आरोप असून, उपचारादरम्यान पतीचा मृत्यू झाला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Odisha Man Dies After Wife Hits With Mobile: ओडिशातील बोलांगीर जिल्ह्यात कौटुंबिक वादातून घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. किरकोळ कारणावरून झालेल्या वादात पत्नीने पतीच्या डोक्यात मोबाईल मारल्याचा आरोप असून, या घटनेत गंभीर जखमी झालेल्या पतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू असून, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी पती-पत्नीमध्ये घरगुती कारणावरून जोरदार वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली, मात्र काही वेळातच हा वाद वाढला. संतापाच्या भरात पत्नीने हातातील मोबाईल पतीच्या डोक्यात मारल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. या हल्ल्यामुळे पतीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

घटनेनंतर कुटुंबीयांनी तातडीने जखमी पतीला बोलांगीर जिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याच्यावर आवश्यक उपचार केले. उपचारानंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे दिसून आल्याने डॉक्टरांनी त्याला घरी जाण्याची परवानगी दिली.

मात्र, घरी परतल्यानंतर काही वेळातच त्याची प्रकृती अचानक खालावली. त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने कुटुंबीयांनी पुन्हा तातडीने रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केली. पोलिसांनी पत्नीसह कुटुंबीयांची चौकशी केली असून, वादाचे नेमके कारण आणि मृत्यूमागील परिस्थितीचा तपास सुरू आहे.

मोबाईलच्या मारामुळेच मृत्यू झाला की इतर कोणते वैद्यकीय कारण होते, याचा उलगडा शवविच्छेदन अहवालातून होणार आहे. पोलिसांनी सांगितले की, शवविच्छेदन अहवाल आणि तपासातून समोर येणाऱ्या पुराव्यांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. सध्या या घटनेचा तपास केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT