Chiplun Crime News: 'लवकर उठा, अशाने भातशेती कशी होणार?' असे सांगणाऱ्या सासूला सुनेची मारहाण; चिपळूणची घटना

mother in law daughter in law fight | चिपळून-रेहेळ येथील घटनेने खळबळ
mother in law daughter in law fight AI Generated Image
mother in law daughter in law fight AI Generated ImagePudhari
Published on
Updated on

चिपळूण : पुढारी वृत्तसेवा

भात लावणीचे काम सुरू असताना सून आणि मुलगा उशिरापर्यंत झोपला. त्यामुळे त्यांना उठविण्याचा प्रयत्न करणाऱ्या सासुबाईंना सुनेने बुक्क्यांनी मारहाण केली. इतकेच नव्हे तर चुलीजवळ ठेवलेला लाकडी होल्टा डोक्यात व हातावर मारून दुखापत केली आणि बघून घेऊ, अशी धमकी दिल्याची घटना चिपळूण तालुक्यातील रेहेळ गावणंगवाडी येथे घडली.

mother in law daughter in law fight AI Generated Image
Kej Crime : केज खूनप्रकरण तापले; अंत्यसंस्कार रोखून कुटुंबीयांचा ठिय्या

याबाबत शनिवारी सकाळी ७ वाजता रेहेळ गावणंगवाडी सुवर्णा कृष्णा नाचरे (वय ७१) यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सून मयुरी दर्शन नाचरे हिच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सुवर्णा नाचरे यांचा छोटा मुलगा दर्शन व सून मयुरी या दोघांना लवकर उठा, शेतात लावणीच्या कामाचे दिवस आहेत, अजून झोपले आहात? अशाने शेती कशी होणार? असे सांगत होत्या.

mother in law daughter in law fight AI Generated Image
Lohagad Case: लोहगडावर धक्कादायक खून उघड; होणाऱ्या नवऱ्याला दरीत ढकलून संपवल्याचा आरोप

सकाळी-सकाळीच सासूने भातशेतीच्या कामाबाबत बोलल्याने त्याचा राग येऊन सून मयुरी हिने सासूला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ करून चुलीजवळ ठेवलेला व्होल्टा डोक्यात व हातावर मारून दुखापत केली. याशिवाय बघून घेईल, अशी धमकीही दिली. अधिक तपास चिपळूण पोलिस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news