Nita Ambani Buy Banarasi Sarees
नीता अंबानी यांनी अनंत-राधिकाच्या लग्नासाठी वाराणसी येथे जाऊन साड्या खरेदी केल्या Nita Ambani Instagram
राष्ट्रीय

नीता अंबानींनी राधिका मर्चेंटसाठी बनारसी साड्यांची 'ही' डिझाईन केली पसंत

स्वालिया न. शिकलगार

पुढारी ऑनलाईन डेस्क : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नासाठी यांनी खास वाराणसी येथे जाऊन साड्यांची शॉपिंग केली. अनेक कारागीरांना बनारसी साड्यांचे ऑर्डर दिले आणि काही साड्या देखील खरेदी केल्या. अंबानी परिवाराकडून साड्यांचे ऑर्डर मिळाल्याने वाराणसीचे कारागीरदेखील खूश आहेत. काही कारागिरांनी साडी बनवण्याचया प्रक्रियेबद्दल देखील सांगितले.

अनंत अंबानी - राधिका मर्चेंटचे लग्न १२ जुलैला जिओ वर्ल्ड कंवेन्शन सेंटर, मुंबईमध्ये होणार आहे. प्री-वेडिंग सेरेमनी आणि लग्नाची तयारी सुरु आहे. दरम्यान, अनंत अंबानीची आई नीता अंबानी वाराणसी पोहोचल्या. खास बनारसी साड्यांची शॉपिंग करण्यासाटी त्यांनी वाराणसीचा फेरफटका मारला.

बनारसी साड्यांची दिली ऑर्डर

बनारसी साड्या इतक्या सुंदर असतात की, ती साडी नेसणं प्रत्येक महिलेलचं स्वप्न असतं. साड्यांच्या ऑर्डरसाठी नीता अंबानी बनारसी साड्यांच्या लूम मालकांची भेट घेतली आणि जवळपास ५०-६० साड्या देखील खेरदी केली. या साड्या निवडण्यासाठी बनारसी साड्यांच्या व्यापारी आणि कारागीरांना हॉटेलमध्ये बोलावण्यात आलं.

साड्या पाहून नीता अंबानी यांनी केलं कौतुक

नीता अंबानी यांनी बनारसी साड्यांवरील नक्षीकाम पाहून कौतुक केले शिवाय अनेक साड्यांचे ऑर्डर पण दिले. लक्खा बूटी साडी त्यांना खूप आवडली, असे एका वृत्तसंस्थेने म्हटले आहे. ही साडी त्या अनंतच्या लग्नात नेसणार आहेत.

लक्खा बुटीशिवाय त्यांनी १५-२० साड्यांचे ऑर्डर एका व्यापाऱ्याला दिले. सर्व साड्या असली जरीने तयार करण्यात येतील, यामध्ये सोने आणि चांदीच्या तारांचा वापर केला जाईल. या साड्यांची किंमत १.५-२ लाख ते ५-६ लाख असते. रिपोर्टनुसार, नीता अंबानीने खूप खास साडी घेतली, त्याला हजारा बूटी म्हटलं जातं. या साडीवर ३५ हजार चांदीचे बुटी बनवली जातात. ही साडी तयार करण्यासाठी ४० ते ४५ दिवस वेळ लागतो.

SCROLL FOR NEXT