Nepal China Border Flash Flood Update pudhari
राष्ट्रीय

China On Nepal Flash Flood: चीननं असं का केलं? नेपाळच्या पत्रकारांचा आरोप, राजदुतांनी दिलं वेगळंच स्पष्टीकरण

Anirudha Sankpal

Nepal China Border Flash Flood Update: नेपाळमध्ये तिबेट सीमेजवळ आलेल्या भीषण पुरामुळे चीनच्या भूमिकेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नेपाळच्या पत्रकारांनी चीनवर गंभीर आरोप केले आहेत. चीनने पूर येत आहे याबाबत नेपाळला वेळेत माहिती दिली नाही असा आरोप या पत्रकारांनी केला आहे. त्यावर आता चीनचे नेपाळमधील राजदूत झांग माओमिंग यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चीनकडून करण्यात येणाऱ्या बचाव कार्याची माहिती देण्यात येत आहे.

चीनचे राजदूत झांग माओमिंग यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ग्यिरोंग - रसुवागढी सीमा भागात आलेल्या नैसर्गिक संकटावर दुःख व्यक्त केलं आहे. त्यांनी सांगितलं की या नैसर्गिक संकटात चीन आणि नेपाळ या दोन्हीकडून मोठी जीवित हाणी झाली आहे.

राजदूत झांग यांनी मृत कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केली असून या कठिण काळात चीन नेपाळसोबत मजबूतीनं उभा आहे असं सांगितलं. त्यांना दावा केला की चीनचे देखील या नैसर्गिक दुर्घटनेत मोठे नुकसान झाले आहे. मात्र असं असलं तरी चीन नेपाळसाठी आपत्कालीन सहकार्य आणि सामुग्री त्वरित पाठवत आहे.

शक्य तो सगळी मदत करणार

झांग माओमिंग यांनी सांगितलं की चीन नेपाळला पुढे देखील शक्य तो सगळी मदत करणार आहे. त्यांनी दोन्ही देश मिळून या कठिण काळाचा सामना करतील. प्रभावित भागातील स्थिती पुन्हा सामान्य करण्यासाठी काम करण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे.

चीनच्या राजदुतांनी नेपाळच्या पत्रकारांकडून करण्यात आलेल्या आरोपांचे थेट उत्तर दिले नाही. चीनने नेपाळला या नैसर्गिक आपत्तीची वेळेवर माहिती का दिली नाही असा सवाल पत्रकारांनी विचारला होता. राजदुतांनी मदत कार्यावरच भर देत या प्रश्नाला बगल दिल्याचे दिसते.

वेळेवर माहिती देणे गरजेचे

ग्यिरोंग - रसुवागढी भाग हा दोन्ही देशांच्यामधील एक महत्वाचा सीमाभाग आहे. अशा परिस्थितीत पूर येत आहे याची माहिती आपत्कालीन परिस्थितीत देणे क्रमप्राप्त आहे. आता ही घटना कूटनैतिक दृष्टीकोणातून देखील पाहिली जात आहे. सध्या दोन्ही देश बचाव कार्यावर जास्त लक्ष केंद्रित करत आहेत.

चीनचे २६५ लोक बेपत्ता

नेपाळ आणि चीनमध्ये या अचानक आलेल्या पूरामध्ये मरणाऱ्यांची संख्या वाढून १६३ इतकी झाली आहे. नेपाळच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की नेपाळमध्ये आतापर्यंत १५७ लोकांचा मृत्यू झाला आहे. ४०३ लोकं बेपत्ता आहेत. चीनमध्ये देखील परिस्थिती गंभीर असून २६५ लोक बेपत्ता असल्याचं सांगण्यात येत आहे. हिमालय सीमा भागात आलेल्या या भीषण पूरामुळे दोन्ही देशांचे जीवित आणि वित्त हानी मोठा प्रमाणात झाली आहे. बचाव कार्य मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आलं आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT