PM Modi in Parliament Monsoon Session
जगभरात भारताची विश्वासार्हता वाढली- पीएम मोदी File Photo
राष्ट्रीय

Parliament Monsoon Session Live|काँग्रेस देशात अराजकता माजवत आहे; PM मोदींची बोचरी टीका

मोनिका क्षीरसागर

बालकबुद्धीला नजरअंदाज न करता, कारवाई करा; PM मोदींची मागणी

राहुल गांधी यांनी ओबीसींना चोर म्हणल्यामुळे त्यांना शिक्षा झाली. त्यांनी सावरकरांवर टीका केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. बालबुद्धीचे लोक संसदेत डोळे मारतात एकमेकांनी मीठी मारतात, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांचा बालकबुद्धी असा उल्लेख केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बालकबुद्धीला नजर अंदाज न करता कारवाई करण्याची मागणी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना केली.

काँग्रेस देशात अराजकता माजवत आहे; PM मोदींची बोचरी टीका

काँग्रेस खोट्या विजयाचा आनंदोत्सव साजरा करत आहे. काँग्रेस भाषेच्या माध्यमातून देशाचे तुकडे करू पाहतंय. काँग्रेसला १०० पैकी ९९ जागा मिळाल्या नाहीत तर ५४३ पैकी ९९ जागांवर काँग्रेस विजयी झाले आहे. हेच काँग्रेसच्या बालबुद्धीला कळत नाही. खोट्या विजयांचा आनंद या पक्षाने व्यक्त करु नये, अशी बोचरी टीका करत काँग्रेस देशात अराजकता माजवत असल्याचा आरोपही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी बोलताना केला.

‘काँग्रेस काळात देश निराशेच्या गर्तेत; मोदींचा आरोप

‘काँग्रेसच्या भ्रष्टाचाराच्या युगाने आपला देश निराशेच्या गर्तेत बुडाला', असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर केला. "एक वेळ असा भ्रष्टाचाराचा होता की, दिल्लीतून पाठवलेल्या प्रत्येक रुपयापैकी केवळ १५ पैसेच इच्छित स्थळी पोहोचले, असे उघडपणे मान्य केले गेले. उर्वरित ८५ पैसे घोटाळ्यांमुळे गेले. भ्रष्टाचाराचे हे युग बुडाल्याचेही त्यांनी काँग्रेसला उद्देशून म्हटले.

विकसित भारत बनवण्यासाठी सर्व प्रयत्न करणार-PM

“मी माझ्या देशवासियांना विश्वास देऊ इच्छितो की, विकसित भारत बांधण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही. आम्ही सर्वोत्कृष्ट काम करण्याचा आमचा प्रयत्न करू” पीएम मोदी म्हणतात.

'इंडिया फर्स्ट' हेच आमचे ब्रीद 

पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले की, "जगातील सर्वात मोठ्या निवडणूक प्रक्रियेत जनतेने आम्हाला निवडून दिले आहे आणि मी काही लोकांच्या वेदना समजू शकतो. ते सतत खोटेपणा पसरवत असतानाही त्यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले."भ्रष्टाचाराच्या विरुद्धच्या आमच्या लढ्यात, आम्ही केवळ 'इंडिया फर्स्ट' द्वारे मार्गदर्शन केलेले, भक्कम सार्वजनिक समर्थन मिळवले आहे," पंतप्रधान मोदी लोकसभेत म्हणाले.

न्याय दो न्याय दो, विरोधकांच्या घोषणा सुरूच

यावेळी नीट परीक्षेबाबत चर्चा करण्याची विरोधकांची जोरदार मागणी केली. न्याय दो न्याय दो, अशा घोषणा विरोधकांनी दिल्या. परंतु, मोदींनी आपले भाषण सुरूच ठेवले.ते म्हणाले की, लोकसभेची निवडणूक देशातील मोठी निवडणूक ठरली. तिसऱ्यांदा देशाची सेवा करण्याची संधी जनतेने आम्हाला दिली आहे. जनतेने आमच्या १० वर्षांच्या कामाचा रेकॉर्ड बघितला आहे. देशसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.

जगभरात भारताची विश्वासार्हता वाढली- पीएम मोदी

''भ्रष्टाचाराविरोधातील झिरो टॉलरन्स धोरणासाठी देशाने आम्हाला आशीर्वाद दिला. आज जगभरात भारताची विश्वासार्हता वाढली आहे. आमच्या प्रत्येक धोरणाचे, प्रत्येक निर्णयाचे, प्रत्येक कृतीचे एकमेव उद्दिष्ट प्रथम भारत आहे." असे पीएम मोदी म्हणाले.

लोकसभा अध्यक्षांनी विरोधकांना खडसावले

पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत भाषणाला उभे राहताच विरोधकांनी संसद सभागृहात प्रचंड गदारोळ घातला. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधकांना आपले वर्तन सभागृहातील संसदीय परंपरेनुसार नाही, असे खडसावून शांत राहण्याचे आवाहन केले. तरीही विरोधकांनी घोषणाबाजी सुरूच ठेवली. विरोधकांच्या प्रचंड गदारोळत देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे भाषण सुरूच ठेवले.

राहुल गांधींवर कारवाईची बांसुरी स्‍वराज यांची मागणी

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या हिंदूंबाबत केलेल्या वक्तव्य प्रकरणी त्‍यांच्‍यावर नियम 115 अन्वये कारवाई करावी, अशी मागणी भाजप खासदार बांसुरी स्‍वराज यांनी लोकसभा अध्यक्षांकडे केली आहे. बांसुरी स्‍वराज म्‍हणाल्‍या की, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेी विधाने वस्तुस्थितीनुसार चुकीची आणि दिशाभूल करणारी आहेत. त्यामुळे नियम 115 अन्वये योग्य ती कारवाई त्‍यांचावर करावी. राहुल गांधींनी जाणूनबुजून केलेल्या चुका लक्षात घेऊन आवश्यक ती कारवाई करावी, अशी माझी मागणी असल्‍याचेही त्‍यांनी नमूद केले.

पीएम मोदी लोकसभेला संबोधित करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (दि.२ जुलै) दुपारी ४ वाजता लोकसभेला संबोधित करणार आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज सातवा दिवस असून, पीएम मोदी त्यांच्या भाषणातून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या आरोपावर प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे.

हा 'इंडिया' आघाडीचा नैतिक विजय; सपा प्रमुख अखिलेश यादव

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव धन्यवाद प्रस्ताव मांडला. यावेळी ते म्हणाले, “लोक म्हणत आहेत की हे सरकार चालणार नाही. लोकसभा निवडणुकीत हा 'इंडिया' आघाडीचा नैतिक विजय होता. हा सकारात्मक राजकारणाचा विजय होता, असेही जनता म्हणत आहे.

'सत्य हे सत्यच असते' ; राहुल गांधी

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी (दि.१ जून) संसद सभागृहात अभिभाषण केले. त्यांच्या भाषणातील काही भाग काढून टाकण्यात आले. यावर लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज (दि.२ जून) संसद परिसरात माध्यमांशी बोलताना म्हणाले, "मोदीजींच्या जगात, सत्य काढून टाकले जाऊ शकते. परंतु प्रत्यक्षात, सत्य काढून टाकले जाऊ शकत नाही. मला जे सांगायचे होते ते मी बोललो, ते सत्य आहे. ते त्यांना पाहिजे तितके काढून टाकू शकतात. सत्य हे सत्य असते."

PM मोदींचे NDA खासदारांना आवाहन

एनडीएच्या प्रत्येक खासदाराने देशाला प्राधान्य देऊन काम केले पाहिजे. खासदारांच्या वर्तनाबद्दल पंतप्रधानांनी मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले, प्रत्येक खासदाराने त्यांच्या मतदारसंघातील बाबी नियमानुसार सभागृहात मांडल्या पाहिजेत. पंतप्रधानांनी NDA खासदारांना संसदेचे नियम, संसदीय लोकशाही प्रणाली आणि आचार यांचे पालन करण्याचे आवाहन केले जे चांगले खासदार होण्यासाठी आवश्यक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

'देशसेवा' हीच पहिली जबाबदारी; PM मोदींचा कानमंत्र

एनडीए खासदारांनी मार्गदर्शन करताना पीएम मोदी म्हणाले, "प्रत्येक खासदार देशाची सेवा करण्यासाठी सभागृहात निवडून आला आहे. मग ते कोणत्याही पक्षाचे असोत. 'देशसेवा' ही आपची पहिली जबाबदारी आहे".

प्रत्येक खासदाराने कुटुंबासह पंतप्रधान संग्रहालयाला भेट द्यावी; PM मोदी

प्रत्येक खासदाराने त्यांच्या कुटुंबासह पंतप्रधान संग्रहालयाला भेट द्यावी. पंतप्रधान संग्रहालयात, पंडित जवाहरलाल नेहरू ते पंतप्रधान नरेंद्र मोदी असा प्रवास कोणताही राजकीय अजेंडा नाही. प्रत्येक पंतप्रधानांच्या योगदानाची संपूर्ण देशाला माहिती व्हावी, त्याचे कौतुक करावे, त्यातून शिकावे आणि त्यांना श्रद्धांजली वाहावी असा हा पहिलाच प्रयत्न असल्याचे पंतप्रधान म्हणाले, अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी माध्यमांना दिली.

एनडीए नेत्यांकडून पंतप्रधान मोदींचे स्वागत

संसद अधिवेशनाचे आजचे सत्र सुरू होण्यापूर्वी सत्ताधारी एनडीए सरकारची बैठक होत आहे. दिल्लीत एनडीएच्या संसदीय बैठकीत सत्ताधारी गटाच्या खासदारांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी NDA आघाडीच्या बैठकीत खासदारांना संबोधित करणार आहेत.

पंतप्रधान मोदी संसदेला संबोधित करणार

राष्ट्रपतींच्या भाषणावरील भाजप खासदार अनुराग ठाकूर का (दि.१ जुलै) लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रस्ताव मांडला. त्यानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेला संबोधित केले. दरम्यान त्यांनी सत्ताधारी भाजप सरकारवर आरोप करत, जोरदार हल्लाबोल केला. यावेळी सत्ताधारी देखील आक्रमक झालेले दिसले. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेला संबोधित करणार असून, राहुल गांधी यांना प्रतित्युत्तर देण्याची शक्यता आहे.

SCROLL FOR NEXT