ओवेसींचे संसद सदस्यत्व रद्द करा : नवनीत राणा

ओवेसींच्या 'जय पॅलेस्टाईन' घोषणेवर आक्षेप घेत सदस्यत्व रद्द करण्याची राष्ट्रपतींकडे मागणी
Navneet Rana has demanded the President to revoke Owaisi's membership in Parliament.
नवनीत राणा यांनी ओवेसींचे संसद सदस्यत्व रद्द करण्याची मागणी राष्ट्रपतींकडे केली आहे. Pudhari File Photo

अमरावती, पुढारी वृत्तसेवा: एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांचे संसद सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी भाजप नेत्या नवनीत राणा यांनी केली आहे. या संदर्भात नवनीत राणा यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना गुरुवारी (दि.27) पत्र सुद्धा लिहले आहे. खासदारांच्या शपथविधी दरम्यान ओवेसी यांनी जय पॅलेस्टाईन अशी घोषणा दिली. यावर अक्षेप घेत राणा यांनी राष्ट्रपतींना त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे.

असदुद्दीन ओवेसी यांनी लोकसभेत दिलेला नारा हा देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी आहे. त्यांनी भारतीय संविधानातील तरतुदीचे उल्लंघन केल्यामुळे त्यांचे संसद सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी नवनीत राणा यांनी केली आहे. देशाची एकता आणि अखंडता अबाधित राखणे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे. संसद सदस्य असताना देखील असदुद्दीन ओवेसी यांनी संविधानाचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे.

Navneet Rana has demanded the President to revoke Owaisi's membership in Parliament.
Navneet Rana: नवनीत राणा यांच्याविरुद्ध तेलंगणातील हैद्राबादमध्ये गुन्हा दाखल

ओवेसी आणि राणांमधील जुना वाद !

भाजप नेत्या आणि एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांच्यामध्ये याआधी अनेकदा शाब्दिक वाद झालेले आहेत. एकमेकांवर दोघांनीही लोकसभा निवडणुकीदरम्यान शाब्दिक वार-प्रतिवार केले आहेत. ओवेसी बंधूकडून आलेल्या 15 मिनिटांच्या वक्तव्याला नवनीत राणांनी पंधरा सेकंदाचे वक्तव्य करून प्रत्युत्तर दिले होते. भाजपने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान स्टार प्रचारक म्हणून नवनीत राणा यांची निवड केली होती. हैदराबाद येथे माधवी लता यांच्या प्रचारासाठी गेल्यावर देखील नवनीत राणा चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरूनही प्रचारादरम्यान नवनीत राणा यांनी असदुद्दीन ओवेसी यांना आव्हान दिले होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news