महाकुंभ File Photo
राष्ट्रीय

NCERT च्या नव्या पाठ्यपुस्‍तकात आता मुघलांऐवजी महाकुंभचा इतिहास !

NCERT New Text Book | विरोधीपक्षांकडून पुस्‍तकांचे ‘भगवेकरण’ केले जात असल्‍याचा आरोप

Namdev Gharal

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT)यांनी आपल्‍या ७ वी साठी नवी पाठ्यपुस्‍तके तयार केली आहेत. यामध्ये पूर्वी अभ्‍यासक्रमात असलेले मुघल व दिल्‍ली राजवटीसंबधी सर्व धडे वगळले आहेत. आत त्‍यांच्या ऐवजी या पुस्‍तकांमध्ये महाकुंभविषयीचा धडा समाविष्‍ट केला आहे. दरम्‍यान अभ्‍यासक्रमातील या बदलाला विरोधीपक्षांकडून आक्षेप घेतला जात आहे. पुस्‍तकांचेही भगवेकरण होत आहे असा आरोप केला जात आहे.

तसेच या पुस्‍तकात मुघल राजवटीचा इतिहास वगळली आहेच त्‍याचबरोबर भारजीय राजवंश, पवित्र भुगोल, महाकुंभ व सरकारी योजना इत्‍यादी धडे समाविष्‍ट केले आहेत. हा निर्णय राष्‍ट्रीय शिक्षण निती २०२३ च्या नुसार भारताच्या परंपरा, दर्शन व शिक्षण पद्धती यावर जोर देतात.

NCERT च्या अधिकाऱ्यांच्यामते हा बदल केलेला या पाठ्यपुस्‍तकाचा पहिला भाग आहे. पुढील महिन्यात याचा दूसरा भाग येईल. कोव्हीड काळानंतर २०२२ - २३ च्या दरम्‍यान या पुस्‍तकांमधून मुघलांविषयीच्या इतिहासाला कात्री लावली होती. पण आता पूर्णतः हे धडे वगळले आहेत. ‘Exploring Society: India and Beyond’ या समाजशास्‍त्राच्या पुस्‍तकात नवीन धडे समाविष्‍ट केले आहेत. यामध्ये मगध, मौर्य, शुंग, सातवाहन या भारतीय वंशाच्या राजवटींचा इतिहास आहे.

नव्या पुस्‍तकात पवित्र भूगोल नावाचा धडा समाविष्‍ट केला आहे. यामध्ये भारतातील पवित्र स्‍थानांचा विस्‍ताराने उल्‍लेख केला आहे. यामध्ये १२ जोर्तिलिंग, चार धाम यात्रा त्‍याचबरोबर शक्‍तीपीठ यांचे वर्णन केले आहे. प्रयागराजमधील आयोजित केलेल्‍या महाकुंभाचा या पुस्‍तकात उल्‍लेख आहे. पण याठिकाणी झालेल्‍या चेंगराचेंगरीचा उल्‍लेख टाळला गेला आहे.

सरकारी योजना असलेल्‍या ‘मेक इन इंडिया’ , ‘बेटी बचाओ - बेटी पढाओ’ यासारख्या योजनांची माहिती असलेला धडाही आहे. तसचे भारताच्या संविधानाविषयी एक धडा आहे ज्‍यामध्ये २००४ मध्ये सर्वोच्च न्यायालने देशाचा झेंडा फडकवने मुलभूत अधिकार असल्‍याचे स्‍पष्‍ट केले होते याचाही उल्‍लेख आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT