

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूडचा खिलाडी कुमार अक्षयने सोमवारी त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले. यावेळी त्यांनी कुंभमेळ्याची व्यवस्था पाहून कौतुक केले. तर कॅटरीना कैफने देखील स्वामी चिदानंद सरस्वती आश्रमाला भेट दिली. यावेळचे व्हिडिओ आणि फोटोज व्हायरल झाले आहेत.
संगममध्ये स्नान केल्यानंतर अक्षय कुमार म्हणाला, "मी खूप आनंद घेतला. यावेळची व्यवस्था खूप शानदार आहे. मी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना धन्यवाद देतो की, त्यांनी इतकी उत्तम व्यवस्था केली. २०१९ च्या कुंभमध्ये लोकांना काही अडचणींचा सामना करावा लागला होता. यावेळी सर्व काही सुव्यवस्थित आहे..."
कॅटरीना कैफने महाकुंभमध्ये परमार्थ निकेतन शिबिरमध्ये स्वामी चिदानंद सरस्वती आणि साध्वी भगवती सरस्वती यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी तिची सासू (विकी कौशलची आई) उपस्थित होती.
सोनाली बेंद्रेदेखील परिवारासोबत पोहोचली. संगममध्ये स्नान केले. बोटीतून सवारी देखील केली.