राष्ट्रीय

Narendra Modi’s oath ceremony : नरेंद्र मोदींच्‍या शपथविधी साेहळा तारखेत बदल? आता ‘या’ दिवशी होणार शपथविधी सोहळा

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदाची शपथ शनिवार,८ जून रोजी होणार असल्‍याच वृत्त होते. मात्र आता ते रविवारी
( ९ जून) पंतप्रधानपदाची शपथ घेण्‍याची शक्‍यता आहे, असे वृत्त 'इंडिया टूडे'ने दिले आहे.

नरेंद्र मोदी यांनी बुधवार, ६ जून रोजी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाचा राजीनामा स्वीकारला. तसेच नवीन सरकार कार्यभार स्वीकारेपर्यंत त्यांना त्यांच्या पदावर कायम राहण्याचे आवाहन केले. यानंतर नरेंद्र मोदी हे शनिवारी पंतप्रधानपदाची शपथ घेतील, असे वृत्त होते. मात्र आता रविवारी शपथविधी सोहळा होईल, असे वृत्त आहे.

चंद्राबाबू नायडू यांचाही शपथविधी सोहळा लांबणीवर

आंध्र प्रदेश मुख्‍यमंत्रीपदी चंद्राबाबू नायडू रविवार, ९ जून रोजी शपथ घेतील, अशी शक्‍यता होती. मात्र आता त्‍याचा शपथविधी सोहळा १२ जूनपर्यंत ढकलण्यात आला आहे. चंद्रबाबू नायडू यांच्‍या शपथविधी सोहळा कार्यक्रमात बदल कर्‍यात आला असून ते आता १२ जून रोजी शपथ घेतील, असे पक्षाच्‍या प्रवक्‍त्‍यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

तेलगू देसम पार्टी हा भाजप प्रणित एनडीएममध्‍ये दुसर्‍या क्रमाकांचा पक्ष ठरला आहे. त्‍यामुळे चंद्राबाबू नायडू आता किंगमेकरच्‍या भूमिकेत आहेत. त्‍याचबरोबर एनडीएमध्‍ये बिहारचे मुख्‍यमंत्री नितीश कुमार यांचीही भूमिका महत्त्‍वपूर्ण राहणार आहे. लोकसभा निवडणूक निकालानंतर आम्‍ही एनडीएसोबतच राहणार, असे चंद्रबाबू नायडू यांनी बुधवारी स्‍पष्‍ट केले. दरम्‍यान,चंद्राबाबू नायडू हे नवीन सरकारमध्‍ये लोकसभा अध्‍यक्षपदासाठी आग्रही असल्‍याची चर्चा आहे. तसेच तेलगू देसम पार्टी सात ते आठ कॅबिनेट आणि एक राज्‍यमंत्रीपदासाठी आग्रही असल्‍याचेही मानले जात आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT