Indo-Pak Tension : भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ( दि.९ मे) रात्री आणि आज (दि.१०) सकाळी पंजाबमधील फिरोजपूर, अमृतसर, पठाणकोट आणि तरनतारन या सीमावर्ती जिल्ह्यांतील अनेक शहरांवर ड्रोन क्षेपणास्त्रांनी हल्ला झाला. सर्व हल्ले सैन्याने हाणून पाडले आहेत. रात्री उशिरापर्यंत शहरांमध्ये स्फोटांचे आवाज येत राहिले. आज सकाळी अमृतसरमध्ये पाकिस्तानने केलेले ड्रोन हल्ले हवाई दलाने हाणून पाडला. यानंतर संपूर्ण अमृतसरमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांना घरातच राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
फिरोजपूरमधील निवासी भागात किमान तीन ड्रोन पडल्याची माहिती आहे ज्यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे. तसेच एका कुटुंबातील तिघे भाजून जखमी झाले आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. अमृतसर आणि भटिंडा येथील सर्व रहिवाशांना इमारतींमध्ये राहून स्वसंरक्षणाचे उपाय करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जालंधरमध्ये सकाळी ८:०९ वाजता रेड अलर्ट सायरन वाजला आणि अनेक ठिकाणी स्फोटांचे आवाज ऐकू आले. प्रशासनाने मोठ्या संख्येने एकत्र येण्यास बंदी घातली. लोकांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. प्रशासनाने लोकांना उंच इमारतींमध्ये प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. जालंधर कॅन्ट आणि आदमपूर बाजारपेठा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. जालंधरमधील मॉल आणि व्यावसायिक इमारती बंद ठेवण्यास सांगण्यात आले आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे, मिळालेल्या आदेशांचे पालन करा.नागरिकांनी सतर्क राहावे, घाबरुन जावू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
शनिवारी सकाळी भटिंडा येथील हवाई दलाच्या तळाजवळ स्फोट झाला. यानंतर लष्कराकडून पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला. स्फोटानंतर सैन्याने स्टेशनचे सर्व दरवाजे बंद केले. प्रशासनाने जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला आहे.
आज पहाटे २ वाजता जालंधरमधील आर्मी कॅम्पजवळ दोन ठिकाणी ड्रोनची हालचाल दिसली. यानंतर संपूर्ण शहरात ब्लॅकआउट लागू करण्यात आला. कांगनीवाल परिसरात एका कारवर रॉकेटसारखी वस्तू पडली. जालंधरजवळील जांडू सिंघा गावात झोपलेल्यावर ड्रोनचे काही भाग पडले. तो जखमी झाला. तीन मिनिटांनंतर, वेर्का मिल्क प्लांटजवळ पाच स्फोटांचे आवाज ऐकू आले. यानंतर पोलिसांनी तिथे शोध मोहीम सुरू केली आहे. दरम्यान, फिरोजपूरमधील निवासी भागात किमान तीन ड्रोन पडल्याची माहिती आहे ज्यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे आणि तीन जण भाजले आहेत, त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. शनिवारी सकाळी अमृतसर आणि भटिंडा येथे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सर्व रहिवाशांना त्यांच्या इमारतींमध्ये राहून स्वसंरक्षणाचे उपाय करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.