Muharram Ujjain Viral Video pudhari
राष्ट्रीय

Muharram Ujjain Viral Video: कुठं नेऊन ठेवलाय 'समाज' आपला... मोहरमला क्रेनवर गाडी चढवून फटक्यांनी दिली उडवून... ४ जणांना अटक

Anirudha Sankpal

Muharram Ujjain Viral Video: उज्जैनमधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत मोहरमच्या मिरवणुकीवेळी एका क्रेनवर एक चार चाकी गाडी वर चढवून ती फटाक्यांनी उडवून दिली होती. या व्हिडिओनंतर नागरिकांमधून कुठं नेऊन ठेवलाय समाज आपला असं म्हणत आहेत. ही घटना उज्जैन जिल्ह्यातील बारनंगर मध्ये घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली असून चार तरूणांना लोकांच्या जिवाशी खेळ केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

हा स्टंट हजारो लोकांच्या उपस्थित गुरूवारी रात्री करण्यात आला. त्यानंतर तो सशोल मीडियावर व्हायरल झाला. ही घटना अदन मोहल्ला इथं झाली. यात आयोजकांनी एक न वापरातील व्हॅन क्रेनवर ले पीर आ गया असं लिहून ती क्रेनला लटकवली होती. दोन तरूण गाडीवर चढून झेंडा फडकवत होते. मात्र ज्यावेळी ही गाडी फटाक्यांनी उडवून दिली त्यावेळी त्यावर कोणी नव्हत. सुदैवानं यात कोणाला दुखापत झालेली नाही.

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून चार आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे. यात गब्बू खान, जावेद खान, तफझील खान आणि क्रेन मालक गोपाल माळी यांचा समावेश आहे. त्यांनी बीएनएसच्या नागरिकांच्या जिवाला हानी पोहचवणे, परवानगीचा गैरवापर, धोकादायक वातावरण निर्माण करणे, सार्वजनिक सुरक्षा धोक्यात घालणे असे चार्जेस लावण्यात आले आहे.

याबाबत स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांनी जमावाचा जीव धोक्यात घेतल्याबाबत काळजी व्यक्त केली आहे. जर ही गाडी क्रेनवरून निसटली असती किंवा ब्लास्टचे तुकडे खाली जमलेल्या जमावावर पडले असते तर मोठी दुर्घटना झाली असती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT