Theft Case : यूट्यूबरला इंन्स्टावर श्रीमंतीच प्रदर्शन नडलं, चोरांनी लाखो रूपयांना लुटलं

यूट्यूबरने फेसबुक-इन्स्टाग्रामवर दाखवली श्रीमंती... चोरांनी साधला निशाणा; काठीने CCTV वळवला आणि कपाट केले साफ.
Theft Case : यूट्यूबरला इंन्स्टावर श्रीमंतीच प्रदर्शन नडलं, चोरांनी लाखो रूपयांना लुटलं
Theft Case : यूट्यूबरला इंन्स्टावर श्रीमंतीच प्रदर्शन नडलं, चोरांनी लाखो रूपयांना लुटलंfile photo
Published on
Updated on

shivpuri youtuber rachna gurjar house theft social media photos viral thieves arrest cctv

पुढारी ऑनलाईन : सोशल मीडियावर श्रीमंतीचे प्रदर्शन पडले महागात; फोटो पाहून चोरांनी केला लाखोंचा माल लंपास. फेसबुक-इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांचे, रोख रकमेचे आणि आलिशान गाड्यांचे फोटो पोस्ट करणे एका महिलेला चांगलेच महागात पडले. या फोटोच्या आधारे चोरांनी तिच्या घराची रेकी केली आणि लाखो रुपयांची चोरी करून फरार झाले.

Theft Case : यूट्यूबरला इंन्स्टावर श्रीमंतीच प्रदर्शन नडलं, चोरांनी लाखो रूपयांना लुटलं
Ravet Firing Case: रावेत गोळीबारानंतर शहरात गँगस्टर नेटवर्कच्या सावटाची चर्चा

आजकाल सोशल मीडियावर आपली आलिशान जीवनशैली, महागडे दागिने आणि लक्झरी वाहनांचे प्रदर्शन करणे सामान्य झाले आहे. मात्र, मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे घडलेली घटना सर्वांसाठी धडा ठरणारी आहे. येथील मोहनी गावात राहणाऱ्या एका महिलेने सोशल मीडियावर सोने-चांदी आणि रोख रकमेसह फोटो पोस्ट केले होते. याच माहितीचा वापर करून चोरांनी तिच्या घरावर डल्ला मारला.

ही धक्कादायक घटना पीडित महिला रचना गुर्जर यांच्या घरी घडली. रचना गुर्जर यांनी काही काळापूर्वी आपल्या सोशल मीडिया खात्यांवर सोन्या-चांदीचे दागिने, मोठी रोख रक्कम आणि लक्झरी कारसोबतचे फोटो व व्हिडिओ शेअर केले होते.

Theft Case : यूट्यूबरला इंन्स्टावर श्रीमंतीच प्रदर्शन नडलं, चोरांनी लाखो रूपयांना लुटलं
Sambhajinagar News : पप्पांना सांगून तुला मारायला लावतो : 10 वर्षांच्या चिमुकल्याला धमकावले

भिंतीवरील काटेरी तार कापून घरात प्रवेश

चोरांनी घराच्या सुरक्षेसाठी भिंतीवर बसवलेल्या लोखंडी काटेरी तारा कटरच्या साहाय्याने कापल्या. भिंत ओलांडण्यासाठी ते सोबत शिडी घेऊन आले होते. शिडीच्या मदतीने त्यांनी कंपाऊंडची भिंत पार केली आणि घरात प्रवेश केला.

काठीने CCTV वळवला, कपाटाचे कुलूप तोडले

घरात CCTV कॅमेरे असल्याची माहिती चोरांना होती. त्यामुळे चोरी करण्यापूर्वी एका चोराने लांब काठीच्या साहाय्याने CCTV कॅमेऱ्याचा कोन वरच्या दिशेने वळवला, जेणेकरून त्यांची ओळख पटू नये.

त्यानंतर चोरांनी घरातील कपाटाचे कुलूप तोडले आणि त्यामध्ये ठेवलेले लाखो रुपयांचे सोन्या-चांदीचे पुर्वजांचे दागिने तसेच रोख रक्कम चोरून नेली. चोरी केल्यानंतर ते पुन्हा शिडीच्या मदतीने पळून गेले. मात्र, त्यांच्या काही हालचाली CCTV मध्ये कैद झाल्या.

अतिरिक्त पोलिस अधीक्षकांची घटनास्थळी भेट

या मोठ्या चोरीनंतर परिसरात खळबळ उडाली. रचना गुर्जर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन संजीव मूले यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरांविरोधात संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिसांची विशेष टीम CCTV फुटेजच्या आधारे चोरांची ओळख पटवण्याचे आणि त्यांचा शोध घेण्याचे काम करत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news