Palghar news | विद्युत रोहित्रांच्या चोरीने जव्हार, मोखाडा हादरले, नागरीकांना सतर्क राहण्याचे आवाहन

Transformer Thefts
Transformer TheftsPudhari
Published on
Updated on

दीपक गायकवाड

खोडाळा : गेली दोन तीन वर्षापासून मोखाड्यात चालु विद्युत प्रवाहात रोहित्र चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्याचे लोन आता जव्हार तालुक्यात ही पसरले आहे. विद्युत रोहित्र प्रशिक्षीत चोरटे बेमालूम पणे चोरून नेत असल्याने, संपुर्ण गाव अंधारात जात आहे. या घटना वारंवार घडत असल्याने, जव्हार, मोखाडा हे दोन्ही तालुके हादरले आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासन ही अलर्ट झाले असून त्यांनी नागरीकांना सतर्क राहण्याचे आवाहन समाज माध्यमातून केले आहे.

गावाला विद्युत पुरवठा करणारी महावितरण ची यंत्रणा गावालगत अथवा गावाबाहेर विद्युत रोहित्राच्या माध्यमातून कार्यान्वित करण्यात आली आहे. गावाच्या नळपाणी पुरवठ्यासाठी अनेक गावात स्वतंत्र विद्युत जोडणी आहे. ती यंत्रणा देखील विद्युत रोहित्रावरच कार्यान्वित असते. मात्र, गेली दोन, तीन वर्षापासून मोखाड्यात चालु विद्युत प्रवाहात रोहित्र चोरीला जाण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे गाव अंधारात जाण्यासह नळपाणी पुरवठा योजना अनेक दिवस बंद पडल्याच्या घटना घडल्या आहेत.

Transformer Thefts
Lawrence Bishnoi Gang Sleeper Cell: लॉरेन्स बिष्णोई गँगचे ‘स्लीपर सेल’ सक्रिय; पिंपरी-चिंचवड पोलिसांसमोर मोठे आव्हान

विद्युत रोहित्र चोरीला जाण्याचे लोणं जव्हार तालुक्यातही पसरले आहे. पोलीस प्रशासनाने समाज माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार जव्हार तालुक्यात ही दोन विद्युत रोहित्र चोरीला गेल्याची घटना घडली आहे. त्यामुळे या घटनांनी दोन्ही तालुके हादरले आहेत. मुळातच चालु विद्युत प्रवाहात रोहित्र चोरणारी ही टोळी प्रशिक्षीत असल्याचा नागरिकांचा संशय आहे. यामध्ये भंगार माफियांचा हात असावा, असा नागरीकांना दाट संशय आहे. मात्र, या घटनांची अजुनही ऊकल झालेली नाही आणि चोरटे ही पकडले गेलेले नाहीत, त्यामुळे ऊन्हाच्या काहीलीने आणि सततच्या खंडित विज पुरवठ्यामुळे त्रस्त झालेले नागरिक विद्युत रोहित्राच्या चोरीच्या घटनांनी अंधारात चाचपडत आहेत.

Transformer Thefts
Temple theft भक्ताच्या वेशातील चोरट्याने मारुती मंदिरावर मारला डल्ला; CCTVच्या आधारे २४ तासांत आवळल्या मुसक्या

पोलीसांचे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन...

ट्रान्सफॉर्मरजवळ संशयास्पद व्यक्ती किंवा वाहन दिसल्यास त्वरित माहिती द्या.

🔹 रात्रीच्या वेळी गावात सामुदायिक गस्त ठेवा.

🔹 ट्रान्सफॉर्मर परिसरात पुरेसा प्रकाश व सुरक्षा व्यवस्था ठेवा.

🔹 अनोळखी व्यक्तींना ट्रान्सफॉर्मर परिसरात विनाकारण वावरू देऊ नका.

🔹 ट्रान्सफॉर्मरचे कुलूप, कुंपण किंवा इतर सुरक्षा साधनांची नियमित तपासणी करा.

🔹 संशयास्पद हालचालींचे फोटो किंवा व्हिडिओ सुरक्षितपणे नोंदवा व पोलिसांना कळवा.

🔹 स्वतः चोरांना पकडण्याचा प्रयत्न करू नका, त्वरित पोलीसांना माहीती द्या.

🚔 संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित 112 वर संपर्क साधण्याचे आवाहन मोखाडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अजित साबळे यांनी समाज माध्यमातून नागरिकांना केले आहे.

Transformer Thefts
Theft Case : यूट्यूबरला इंन्स्टावर श्रीमंतीच प्रदर्शन नडलं, चोरांनी लाखो रूपयांना लुटलं

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news