राष्ट्रीय

भारतात मार्चपासून 16 हजारहून अधिक उष्माघात तर 60 मृत्यूची नोंद

करण शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : वाढत्या तापमानामुळे देशामध्ये मोठ्या प्रमाणात उष्मा वाढल्याने मार्च 2024 पासुन आतापर्यंत उष्णतेमुळे 60 मृत्यूची नोंद झाली आहे. 1 मार्चपासून, उष्माघातामुळे 32 आणि संशयित उष्माघातामुळे 28 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर बुधवारी (दि.22) मे  दिलेल्या सरकारी आकडेवारीनुसार आंध्र प्रदेश आणि राजस्थानच्या कोटा येथे उष्माघाताने दोन मृत्यूची नोंद झाली आहे.

एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रम (IDSP) अंतर्गत उष्मा-संबंधित आजारांवर सक्रिय देखभालीचा एक भाग म्हणून केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत, राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राद्वारे (NCDC) हा उष्माघाताचा आकडा नोंदवला गेला आहे. नवीन  उष्माघाताची प्रकरणे आणि मृत्यू दर 24 तासांनी नोंदवले जातात, जे देशभरातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांद्वारे केंद्रीकृत प्लॅटफॉर्मवर नोंदवले जातात. दरम्यान, या वर्षी 1 मार्चपासून देशात 16,344 संशयित उष्माघाताची प्रकरणे आढळली आहेत, तर (दि.22) मे रोजी 486 संशयित उष्माघात प्रकरणांची नोंद झाली आहे. उष्माघात ही एक अशी वैद्यकीय परिस्थिती आहे, ज्यामध्ये शरीर जास्त गरम होते, त्यामुळे मेंदू, यकृत आणि मूत्रपिंड यासारख्या महत्वाच्या अवयवांचे सामान्य कार्य बिघडते आणि शरीर हालचाल करण्याचे बंद करते.

"डॉ. अतुल गोगिया म्हणाले, काही रुग्णांमध्ये निस्तेजपणा आणि लघवी कमी होणे यासारखी लक्षणे दिसतात. तर शरीराचे तापमान वाढणे, सुस्ती, अशक्तपणा आणि तोंड कोरडे पडणे यासह आपत्कालीन किंवा ओपीडीमध्ये उष्माघाताच्या रुग्णांची संख्या वाढली आहे, मोठ्या गुंतागुंत टाळण्यासाठी स्वतःला थंड आणि हायड्रेटेड ठेवण्यासाठी उपायांचे पालन करणे आवश्यक आहे."

24 मे रोजी, भारतीय हवामान खात्याने (IMD) रेड अलर्ट जारी केला आणि चेतावणी दिली आहे की राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदीगड, पश्चिम उत्तर प्रदेश आणि दिल्लीच्या अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट असेल. 24-27 मे दरम्यान मोठी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचे सांगितले आहे. दिल्लीतील वाढत्या तापमानाचा विचार करता उष्माघात हा चिंतेचा विषय बनला आहे.

डॉ. अजय अग्रवाल, म्हणाले "वाढत्या तापमानामुळे, उष्णतेच्या लाटेचे दुष्परिणाम अनुभवणाऱ्या लोकांच्या संख्येत सुमारे 20-30% वाढ झाली आहे. आजकाल बाह्यरुग्ण विभागांमध्ये ओटीपोटात दुखणे, अशक्तपणा, मळमळ, उलट्या असलेले बरेच रुग्ण येत आहेत. अशा व्यक्तींनी दररोज दोन ते तीन लिटर पाणी पिणे, बाहेर फिरताना टोपी घालणे आणि सुती कपडे घालणे यासारखे प्रतिबंधात्मक उपाय करण्याची शिफारस केली जाते."

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT