Indian wins 240 crore lottery in UAE
आई आणि मुलाचे नाते हे तसं शब्दातीतच. आईचे मुलांवरील निस्वार्थी प्रेम हे मुलाच्या प्रगतीसाठीची प्रत्येक क्षणाला केलीली प्रार्थनाच असते. आईने आजवर केलेल्या प्रेमाचे आणि त्यागबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्याने आईच्या जन्मतारखेचे स्मरण केले आणि काही सेकंदांमध्येच त्याचे नशीब पालटले. ही गोष्ट आहे केरळमधील २९ वर्षीय अनिलकुमार बोला याची. त्याने संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये तब्बल १०० दशलक्ष दिऱ्हम (भारतीय चलनात सुमारे २४० कोटी रुपये) इतक्या भव्य लॉटरीचे बक्षीस जिंकले आहे.
दुबईमधील 'खलीज टाईम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, अनिलकुमार बोला हा तरुण मागील काही वर्ष अबू धाबीमध्येवास्तव्यास आहे. एकाच वेळी त्याने लॉटरीची १२ तिकिटे खरेदी केली होती. प्रत्येक लकी डे तिकिटासाठी खेळाडूंना ५० दिऱ्हम (सुमारे ₹ १,२८५) द्यावे लागतात. लकी डे ड्रॉमध्ये त्याने त्याने 'इझी पिक' पर्यायाचा वापर करून विजयी तिकीट निवडले. यासाठी त्याने ११ हा अंक निवडला. हा अंक निवडीमागे कारण होते की, ११ ही त्याच्या आईची जन्मतारीख होती.
लकी ड्रॉ घोषित होत असताना बोल्ला घरी आराम करत होता. त्याला यूएई लॉटरी टीमचा फोन आला. हा फोट त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. मी तब्बल २४० कोटी रुपयांचे लॉटरी जिंकली आहे, ही बातमी ऐकून सुरुवातीला सुखद धक्का बसला. खूप आनंद झाला. यूएई लॉटरीने सोमवारी सामायिक केलेल्या एका व्हिडीओमध्ये तो म्हणाला, "मला धक्का बसला होता. मी सोफ्यावर बसलो होतो आणि मला फक्त जाणवत होते की, हो, मी जिंकलो आहे."
तब्बल २४० कोटी रुपयांची लॉटरी जिंकल्यानंतर अनिलकुमार बोला याने सांगितले की, एवढी रक्कम जिंकल्यानंतर मला वाटले की, आता माझ्याकडे पैसा आहे. आता मला माझ्या विचारांवर योग्य प्रकारे काम करण्याची गरज आहे. मला काहीतरी मोठे करायचे आहे. बक्षिसाची रक्कम आपल्या पालकांची स्वप्ने पूर्ण करणार आहे. मला फक्त माझ्या कुटुंबाला यूएईमध्ये घेऊन यायचे आहे. त्यांच्यासोबत राहून माझ्या संपूर्ण आयुष्याचा आनंद घ्यायचा आहे. माझ्या आई- वडिलांची स्वप्ने खूप लहान आहेत. मला त्यांची सर्व स्वप्ने पूर्ण करायची आहेत. मला त्यांची काळजी घ्यायची आहे, असेही त्याने स्पष्ट केले.
वैयक्तिक आणि कौटुंबिक स्वप्ने पूर्ण करण्याव्यतिरिक्त बक्षिसातील काही रक्कम धर्मादाय संस्थांना दान करण्याचाही मानस बोल्ला याने व्यक्त केला आहे. लॉटरीमधील काही रक्कम धर्मादाय संस्थांना दान करण्याची योजना आहे. हे दान खऱ्या अर्थाने गरजू लोकांना मिळेल. त्यामुळेच मला खरा आनंद मिळेल. तसेच एक सुपरकार खरेदी करण्याबरोबर आलिशान रिसॉर्टमध्ये जल्लोष करण्याचे नियाजनही त्याने केले आहे.
"माझा विश्वास आहे की प्रत्येक गोष्ट काहीतरी कारणास्तव घडते. मी प्रत्येक खेळाडूला खेळत राहण्याचा सल्ला देतो, आणि खात्रीने, एक दिवस नशीब तुमच्याकडे नक्कीच येईल," असा विश्वासही त्याने लॉटरीमध्ये नशीब आजमविणार्यांना दिला आहे.