मोहम्मद शमी याची पत्‍नी हसीन जहाँने दाखल केलेली याचिका सर्वोच्‍च न्‍यायालयात सूचीबद्ध करण्यात आली आहे.  Pudhari Photo
राष्ट्रीय

Mohammed Shami |क्रिकेटपटू मोहम्‍मद शमीच्‍या पत्‍नीची सुप्रीम कोर्टात धाव, कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी कोणती मागणी केली?

Mohammed Shami Domestic Violence Case | सर्वोच्च न्यायालयाने मोहम्‍मद शमीला बजावली नोटीस

पुढारी वृत्तसेवा

Mohammed Shami Domestic Violence Case

मुंबई : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याची पत्‍नी हसीन जहाँने सर्वोच्‍च न्‍यायालयात दाखल केलेली याचिका न्यायमूर्ती मनोज मिश्रा आणि मनमोहन यांच्या खंडपीठासमोर सूचीबद्ध करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी खंडपीठाने त्‍याला नोटीस बजावली आहे.

२०१८ पासून शम्‍मीविरोधात कायदेशीर लढाई

शमी आणि हसीन यांचा विवाह २०१४ मध्‍ये झाला होता. त्‍यांना जुलै २०१५ मुलगी झाली. जहांला तिच्या पहिल्‍या लग्‍नापासून दोन मुली आहेत. हसीन जहाँने २०१८ मध्‍ये मोहम्‍मद शमीवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला. त्‍यानंतर गुन्‍हा दाखल करण्‍यात आला होता. यानंतर तिने अंतरिम भरपाईसाठी दरमहा स्वतःसाठी सात लाख रुपये तर मुलीसाठी तीन लाख रुपयांची मागणी करणारा अर्ज घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा (डीव्ही कायदा) अंतर्गत दंडाधिकाऱ्यांसमोर दाखल केला होता. सत्र न्‍यायालयाने शमीला मासिक भरपाई म्हणून दरमहा १ लाख ३० हजारु रुपये देण्‍याचे आदेश दिले. यानंतर याला आव्‍हान देत हसीन जहाँने उच्‍च न्‍यायालयात धाव घेतली. जुलै २०२५ मध्ये उच्च न्यायालयाने पोटगी दरमहा ४ लाख रुपये केली होती. तसेच उच्च न्यायालयाने शमीविरुद्धच्या घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत पत्नीला दरमहा दीड लाख रुपये तर मुलीला अडीच लाख रुपये देण्‍याचे निर्देश शम्‍मीला दिले होते.

हसीन जहाँने आता नेमकी कोणती मागणी केली?

मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँ हिने तिची कौटुंबिक प्रकरणे (घरगुती हिंसाचार आणि पोटगी) पश्चिम बंगालमधील कोर्टातून दिल्लीला हलवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला आहे. या अर्जाची दखल घेत शुक्रवारी न्यायालयाने मोहम्मद शमीला आपली बाजू मांडण्यासाठी नोटीस पाठवली आहे.

पोटगी खटला दिल्‍लीत हस्‍तांतरीत करण्‍यासाठी सांगितली 'ही' कारणे

हसीन जहाँने आपली कोर्टाची प्रकरणे दिल्लीला हलवण्यासाठी काही महत्त्वाची कारणे दिली आहेत. तिने अर्जात म्‍हटलं आहे की, दिल्लीत राहून पश्चिम बंगालला वारंवार जाणे तिच्यासाठी आणि तिच्या मुलीसाठी खूप त्रासाचे आहे. मुलीच्या चांगल्या भविष्यासाठी आणि वाढीसाठी ती आता दिल्लीत स्थायिक झाली आहे. त्यामुळे कोलकात्याला जाऊन कोर्टाच्या कामात भाग घेणे तिला शक्य नाही. माझं स्वतःचे उत्पन्नाचे साधन नाही. तिला एकटीलाच मुलीचा सांभाळ करावा लागतो. अशा वेळी दिल्लीपासून १५०० किमी लांब असलेल्या पश्चिम बंगालला जाणे तिला आणि मुलीला खूप त्रासदायक ठरत आहे.मोहम्मद शमी क्रिकेटमुळे सतत देशभर फिरत असतो, त्यामुळे त्याच्यासाठी दिल्लीत केस लढणे कठीण नाही. शमीचे कुटुंब उत्तर प्रदेशात राहते, जे कोलकात्याच्या तुलनेत दिल्लीपासून जास्त जवळ आहे. त्यामुळे तिथे खटला चालवणे दोघांच्याही दृष्टीने सोयीचे ठरेल, असेही हस्‍ने आपल्‍या याचिकेत नमूद केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT