Mocking Wife a High Court  pudhari
राष्ट्रीय

Mocking Wife a High Court : पत्नीला रंगावरून, हुशारीवरून टोमणे मारणे क्रूरता नाही... उच्च न्यायालयाचा आगळा वेगळा निर्णय

Anirudha Sankpal

Mocking Wife a Jharkhand High Court : झारखंड उच्च न्यायालयाने एक आगळा वेगळा निर्णय दिला. झारखंड उच्च न्यायालयासमोर एका पत्नी आपल्या पतीवर त्याने तिचा काळा रंग आणि कॉमन सेन्सवरून टोमणे मारले. ही क्रुरता आहे असा आरोप केला होता. कोर्टाने या प्रकरणी निकाल देताना स्पष्ट केलं की पत्नीला तिच्या काळ्या रंगावरून किंवा कॉमन सेन्स, खराब संवाद कौशल्य यावरून टोमणा मारणे हे भारतीय दंडसंहिता कलम ४९८अ अंतर्गत गुन्हेगारी क्रुरतेच्या कक्षेत येत नाही.

जस्टिस अनिल कुमार चौधरी यांच्या बेंचने गुन्हेगारी याचिका क्रमांक ४८४/2025 वर आज सुनावणी घेतली. त्यावेळी रांचीच्या खालच्या कोर्टाने पतीविरूद्ध जारी केलेली नोटीस आणि ४९८अ ची कार्यवाही रद्द केली. कोर्टाने सांगितलं की जर सर्व आरोप जरी खरे मानले तरी कलम ४९८ अ अंतर्गत हा गुन्हा होत नाही.

या याचिकेतील पती पत्नींचा विवाह ऑनलाईन मेट्रोमोनियल वेबसाईटद्वारे झाला होता. लग्नाला काही काळ झाल्यानंतर या दोघांमध्ये वाद सुरू झाला. पत्नीने आरोप केला तिचा काळा रंग, लाजरा स्वभाव, कमी बोलण्याची सवय यावरून पती मला कायम टोमणे मारत होते.

पतीने उलटा दावा केला होता की, पत्नीमुळे त्याला एक आजार झाला आहे. या आजाराची फळे तो अजूनही भोगतोय. त्यामुळेच मी पत्नीला घर सोडण्यास सांगितलं. त्यानंतर पत्नी बंगळुरूमधील आपल्या छोट्या बहिणीकडे गेली. त्यानंतर ती कोलकात्यात आपल्या मोठ्या बहिणीकडे रहायला गेली.

पतीने रांची कौंटुबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर पत्नीने रांचीच्या कोर्टात पतीविरूद्ध ४९८अ आणि स्त्रीधन परत न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. ११ जून २०२४ रोजी प्रथम श्रेणी कोर्टाने पतीविरूद्ध समन्स जारी केला होता. त्याला पतीने उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं.

उच्च न्यायालयाचे काय आदेश?

उच्च न्यायालयात पतीकडून वकील इंद्रजीत सिन्हा आणि अश्विनी प्रिया यांनी म्हणणे मांडले. झारखंड उच्च न्यायालय कलम ४९८ अ चे कायदेशीर व्याख्या स्पष्ट करताना हे प्रकरण रद्द केलं. न्यायालयाला या आरोपात कोणत्या प्रकारचा हुंडा किंवा अवैध संपत्तीची मागणी केली नव्हती असं आढळून आलं.

कलम ४९८ अ अंतर्गत त्याचवेळी क्रुरता मानली जाईल ज्यावेळी पतीच्या वागण्यामुळे पत्नी आपलं जीवन संपवण्यापर्यंत हतबल होते. तिच्या शारीरिक स्वास्थ्याला गंभीर इजा होते. कोर्टाने रंगावरून हुशारीवरून टोमणे मारणे नैतिकदृष्ट्या योग्य नाही. मात्र हा काही IPC 498A अंतर्गत क्रुरता किंवा गुन्हेगारी नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT