राष्ट्रीय

Iran Israel US conflict | मध्‍यपूर्वेतील तणाव वाढला, जगभरात ६,००० हून अधिक उड्डाणे रद्द

Iran Israel US conflict |पश्‍चिम आशियातील अनेक देशांनी बंद केली हवाई हद्द

पुढारी वृत्तसेवा

Iran Israel US conflict |

दुबई/नवी दिल्ली : इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर केलेल्‍या हल्ल्यानंतर मध्यपूर्वेतील तणाव शिगेला पोहोचला आहे. या हल्‍ल्‍याचा सर्वाधिक फटका हा हवाई सेवेवर झाला आहे. पश्चिम आशियातील अनेक देशांनी आपली हवाई हद्द बंद केल्यामुळे आज जगभरात ६,००० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. यामध्ये एमिरेट्स, एतिहाद आणि भारताची इंडिगो या विमान कंपन्यांना सर्वाधिक फटका बसला आहे.

लाखो प्रवासी हॉटेलसह विमानतळांवर अडकून पडले

युद्धामुळे या भागातील विमानतळ बंद करण्यात आले असून लाखो प्रवासी विमानतळ आणि हॉटेल्समध्ये अडकून पडले आहेत. विमानतळ पुन्हा कधी सुरू होतील, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. 'फ्लाईट अवेयर' (FlightAware) या संकेतस्थळानुसार, मध्यपूर्वेतील एमिरेट्स, एतिहाद एअरवेज, फ्लाई दुबई आणि कतार एअरवेज या कंपन्यांच्या सेवेवर मोठा परिणाम झाला आहे.

विमान कंपन्यांची आज दुपारी १:४० वाजेपर्यंतची स्थिती

कंपनी उड्डाणे रद्द

एमिरेट्स: ४८५

एतिहाद : १९०

फ्लाई दुबई १८१

कतार एअरवेज १०६

भारतीय विमान कंपन्यांमध्ये इंडिगोला सर्वाधिक फटका बसला असून त्यांची १२९ उड्डाणे रद्द झाली आहेत, तर एअर इंडियाची २८ उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

दुबई आंतरराष्‍ट्रीय विमानतळ बंद

इराणने संयुक्त अरब अमिरातीवर (UAE) केलेल्या प्रतिहल्ल्यानंतर दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद ठेवण्यात आले आहे. येथून सुटणारी ४३५ आणि येथे उतरणारी ३९५ उड्डाणे रद्द झाली आहेत. अबु धाबी विमानतळावरही जवळपास २४४ उड्डाणांना फटका बसला आहे.

सर्वाधिक परिणाम झालेली ५ विमानतळ

१ दुबई (DXB) ४३५ दुबई (DXB) ३९५

२ अबु धाबी (AUH) १२१ अबु धाबी (AUH) १२३

३ बेन गुरियन (TLV) ९२ हमद (DOH) १०४

४ हमद (DOH) ५५ बेन गुरियन (TLV) ८५

५ बहरीन (BAH) ४५ बहरीन (BAH)

भारत सरकारने जार केले हेल्‍पलाईन क्रमांक

भारताच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे 'पॅसेंजर असिस्टन्स कंट्रोल रूम' (PACR) २४ तास कार्यरत असून सोशल मीडिया, 'एअरसेवा' (AirSewa) पोर्टल आणि हेल्पलाईनद्वारे प्रवाशांच्या शंकांचे निरसन केले जात आहे.

भारतीय प्रवासी खालील हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधू शकतात:

दूरध्वनी: 011-24604283 / 011-24632987

पोर्टल: एअरसेवा (AirSewa) किंवा अधिकृत सोशल मीडिया हँडल्स.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT