Meerut murder pudhari photo
राष्ट्रीय

Wife Killed Husband: गावाबाहेर सापडला पुरलेला मृतदेह... पोलिसांना होता चोरीचा संशय, निघालं तीन मुलांच्या आईचं प्रेम प्रकरण!

मेरठच्या मुस्कान ड्रम प्रकरणाची आठवणी ताजी झाली.

Anirudha Sankpal

Crime News Extra Marital love affair:

गावाबाहेर एका पुरूषाचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेच सापडला. त्याला तीन गोळ्या मारल्याचं तपासात निष्पन्न झालं. या पुरूषाची पत्नी मृतदेह मिळताच धाय मोकलून रडू लागली. आता तिच्या तीन मुलांच कसं होणार याची चिंता अख्ख्या गावाला सतावत होती. पोलिसांच्या तापासाची दिशा देखील चोरीच्या दिशेनं जात होती. पोलिसांना हा खून चोरी प्रकरणातला आहे असा संशय होता.

मात्र कहानीत असा काही ट्विस्ट आला की सगळ्यांनीच तोंडात बोटं घातली. ती तीन मुलांची आई काही दिवसातच आपल्या प्रेमीसोबत पळून गेली. आता पोलिसांनी आपल्या तपासाची चक्र उलट्या दिशेनं फिरवली. त्यांनी या तीन मुलांच्या आईच्या प्रेम प्रकरणाच्या खोलात जायचं ठरवलं. जसजसा तपास पुढे सरकत होता तसतसं प्रकरण वेगळ्याच दिशेला जाऊ लागलं.

पत्नी गावातून गायब अन् प्रकरणाला वेगळी कलाटणी

मृत व्यक्तीच्या पत्नीला काही प्रश्न विचारण्यासाठी अगवानपूर गावात गेले त्यावेळी ती तिच्या गावातून गायब असल्याचं आढळून आलं. पोलिसांनी खोलात जाऊन चौकशी केल्यावर या तीन मुलांच्या आईचं अंजलीच प्रेम प्रकरण सुरू असल्याचं समोर आलं. अंजलीच्या प्रेमचं नाव अजय तो त्याच गावाचा रहिवासी होता.

अजय देखील काही दिवसांपासून घरी आला नव्हता. त्यानंतर पोलिसांनी एक एक डॉट कनेक्ट करायला सुरूवात केली. पोलीस तपासात हे प्रेमी युगल एकत्र लपून बसल्याचं दिसून आलं. या दोघांना पोलिसी खाक्या दाखवत चौकशी केल्यानंतर अजयनं सर्व सत्य उघड केलं.

अजय पोलिसांना म्हणाला की, अंजलीचा पती राहुलला आमच्या लव्ह अफेअरबद्दल कळालं होतं. त्यामुळं अंजली खूप अस्वस्थ झाली होती. तिनं राहुलला मारण्याचा प्लॅन आखला. तिच्या प्लॅननुसार अजयनं राहुलला गावाबाहेरच्या शेतात भेटायला बोलवलं. ज्यावेळी राहुल आला त्यावेळी अजयनं त्याला तीन गोळ्या घातल्या.

पत्नीनं पतीचा काटा काढण्याची दुसरी घटना

विशेष म्हणजे मेरठ जिल्ह्यात अशाच विवाहबाह्य प्रेमसंबंधातून अजून एका पतीचा खून झाल्याचं समोर आलं. काजल नावाची महिलेनं आपल्या पतीला आधी झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर आपल्या प्रेमीच्या मदतीनं त्याला घरापासून काही किलोमीटर लांब असलेल्या कालव्याजवळ मोटरसायकलवरून नेलं. काजलच्या स्कार्फनं पतीला बांधून त्याची बॉडी कालव्यात टाकण्यात आली.

उत्तर प्रदेशात पत्नीकडून पतीची हत्या करण्यात येण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यात मेरठच्या अजून दोन प्रकरणांची भर पडली आहे. या दोन प्रकरणांमुळं मेरठमधील ड्रम मर्डर केसच्या आठवणी ताज्या झाल्या. तीन मार्च रोजी मुस्कान आणि तिच्या प्रेमी साहिल शुक्लानं पती सौरभ राजपूतचा खून करून त्याचा मृतदेहाचे तुकडे करून तो ड्रममध्ये भरून ठेवला होता. त्यानंतर तो ड्रम सिमेंटनं भरून टाकला. हे सर्व करून झाल्यावर हे प्रेमी जोडपं हिमाचल प्रदेशला पळून गेलं होतं. नंतर महिलेनं तिच्या कुटुंबियांकडे गुन्ह्याची कबुली दिली होती. त्यानंतर कुटुंबियांनी पोलिसांना घडलेला प्रकार कळवला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT