

सातारा : पत्नीकडे बघत असल्याने त्याबाबतचा जाब विचारल्याच्या कारणातून 5 जणांच्या टोळक्याने पतीवर कोयत्याने हल्ला करत मारहाण केली. विसावा नाका ते कल्याणी शाळा दरम्यान ही घटना घडली असून साताऱ्यातील या गुंडाराजमुळे संतापाची लाट उसळली आहे.
ही घटना दि. 6 नोव्हेंबर रोजी घडली आहे. महिलेने 5 जणांविरुद्ध तक्रार दिली आहे. तक्रारदार महिला पतीसोबत निघाली होती. त्यावेळी विसावा नाका ते कल्याणी शाळा व गोडोली नाका या दरम्यान संशयित मुले तिच्याकडे पाहात होती. यामुळे पतीने त्यांना त्याबाबत विचारणा केली. यावर संशयित मुलांनी वाद घालत तक्रारदार महिलेच्या पतीला कोयत्याने मारहाण केली. या घटनेनंतर संशयित मुले दुचाकीवरून पळून गेली.