राष्ट्रीय

Malegaon blasts case: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी ATS अधिकाऱ्याविरोधात वॉरंट

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी एका  ATS अधिकाऱ्याविरोधात वॉरंट जारी करण्यात आले आहे. मालेगाव बॉम्बस्फोट केस प्रकरणात जबाब नोंदवण्यास वारंवार हजर न राहिल्याबद्दल संबंधित ATS अधिकाऱ्याविरूद्ध हे वॉरंट काढण्यात आले आहे. यानुसार, NIA न्यायालयाने एटीएस अधिकाऱ्याविरुद्ध १० हजार रुपयांचे जामीनपात्र वॉरंट जारी करत  २ मे रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

'एएनआय'ने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित ATS अधिकारी २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट चौकशी प्रकरणातील प्राथमिक तपास पथकाचा भाग होते. त्यांनी बॉम्बस्फोट चौकशी प्रकरणात अनेक साक्षीदारांचे जबाब नोंदवले होते. दरम्यान वेळोवेळी ते याप्रकरणातील चौकशीला हजर न राहिल्याने या अधिकाऱ्याला वॉरंट जारी करत, न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

२००८च्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातीलएका फिर्यादी साक्षीदाराला विशेष राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) बुधवारी फितूर घोषित केले होते. या खटल्यातील तो ३३वा साक्षीदार असल्याचे देखील तपास यंत्रणेने स्‍पष्‍ट केले होते.

हेही वाचा:

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT