Mohammad Asif LeT Terrorist Pudhari
राष्ट्रीय

LeT Terrorist Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये सैन्याने डाव उधळला; LeT च्या दहशतवाद्याचा खात्मा, युद्धसामग्री जप्त

Mohammad Asif LeT Terrorist: जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यातील युसमर्ग परिसरात सुरक्षा दलांनी केलेल्या संयुक्त कारवाईत लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी मोहम्मद आसिफ उर्फ हाशिम मूसा ठार झाला.

Rahul Shelke

Mohammad Asif LeT Terrorist: जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईत लष्कर-ए-तैयबाचा (LeT) एक दहशतवादी ठार झाला आहे. ठार झालेल्या दहशतवाद्याची ओळख पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबाचा कमांडर मोहम्मद आसिफ उर्फ हाशिम मूसा अशी करण्यात आली आहे. त्याचा मृतदेह आणि युद्धाचं साहित्य सुरक्षा दलांनी ताब्यात घेतलं आहे.

भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने या कारवाईची माहिती दिली. मध्य काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील युसमर्ग परिसरातील कोराग भागात ही चकमक झाली. या कारवाईत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला.

गुप्त माहितीच्या आधारे शोधमोहीम

सुरक्षा दलांना परिसरात दहशतवादी लपून बसल्याची ठोस माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे भारतीय लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफच्या श्रीनगर युनिटने संयुक्त शोधमोहीम सुरू केली.

सुरक्षा दलांचे जवान परिसरात शोध घेत असताना त्यांना काही संशयास्पद हालचाली दिसल्या. त्यानंतर जवानांनी संशयितांना थांबण्याचे आवाहन केले. मात्र, दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांच्या दिशेने गोळीबार सुरू केला.

यानंतर जवानांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. काही काळ दोन्ही बाजूंमध्ये जोरदार चकमक झाली. या चकमकीत लष्कर-ए-तैयबाचा एक दहशतवादी ठार झाला.

मृतदेहासोबत युद्धाच साहित्य

चकमकीनंतर सुरक्षा दलांनी परिसराची तपासणी केली. यावेळी ठार झालेल्या दहशतवाद्याचा मृतदेह सापडला. त्याच्यासोबत युद्धासाठी वापरले जाणारे साहित्यही जप्त करण्यात आले आहे.

लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, मृत दहशतवाद्याची ओळख मोहम्मद आसिफ उर्फ हाशिम मूसा अशी झाली आहे. तो पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबाशी संबंधित असल्याचे लष्कराने सांगितले.

या कारवाईनंतर परिसरात आणखी दहशतवादी लपले आहेत का, यासाठी सुरक्षा दलांकडून शोधमोहीम सुरू ठेवण्यात आली आहे. परिसरातील सुरक्षा व्यवस्था देखील वाढवण्यात आली आहे.

सुरक्षा दलांची संयुक्त कारवाई

या कारवाईत भारतीय लष्करासोबत जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफने संयुक्तपणे सहभाग घेतला. गुप्त माहितीच्या आधारे सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेत सुरक्षा दलांनी संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवले आणि त्यानंतर झालेल्या चकमकीत दहशतवाद्याचा खात्मा केला.

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलांकडून सातत्याने कारवाया सुरू आहेत. विशेषतः डोंगराळ आणि जंगल भागात दहशतवादी लपण्याची शक्यता लक्षात घेऊन सुरक्षा दलांकडून शोधमोहीम राबवली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT