Gujarat Drug Bust 2026: अरबी समुद्रात मोठी कारवाई ५ पाकिस्तान्यांसह तब्बल ३००० कोटींचे अंमली पदार्थ जप्त

गुजरात एटीएससोबत मिळून भारतीय तटरक्षक दलाने राबवलेल्या मोहिमेत तब्बल ५६२ किलो उच्च दर्जाचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे.
Gujarat Drug Bust 2026
Gujarat Drug Bust 2026pudhari
Published on: 
Updated on: 

Gujarat Drug Bust 2026: भारतीय तटरक्षक दलाने अरबी समुद्रात मोठी कारवाई केली आहे. अंमली पदार्थ सिंडिकेट चालवणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला हा मोठा धक्का मानला जात आहे. गुजरात एटीएससोबत मिळून भारतीय तटरक्षक दलाने राबवलेल्या मोहिमेत तब्बल ५६२ किलो उच्च दर्जाचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे.

या अंमली पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत जवळपास ३००० कोटी रूपयांपेक्षा जास्त असल्याचं सांगितलं जात आहे. या कारवाईवेळी तटरक्षक दलाने संशयित इराणी जहाज जप्त केली आहे. त्यावरील पाकिस्तानी नागरिकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. हा कारवाई २५ सप्टेंबर रोजी लक्षद्वीपच्या पश्चिममध्ये अरबी समुद्रात करण्यात आली.

Gujarat Drug Bust 2026
MPSC Drug Inspector Paper Leak | एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटीची साखळी उलगडणार?

टीप मिळाल्यानंतर केली कारवाई

भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसने अंमली पदार्थाची खेप समुद्राच्या मार्गाने येणार आहे अशी टीप मिळाली होती. त्यानंतर समुद्र मार्गे आणि हेलिकॉप्टरमधून देखील शोधमोहीम सुरू केली होती. माहिती कन्फर्म झाल्यावर या इराणी लाकडी जहाजाचा पाठलाग केला. शेवटी हे लाकडी जहाज थांबवून त्याचा तपास करण्यात आला.

Gujarat Drug Bust 2026
Drug Inspector Exam Paper Leak | औषध निरीक्षक प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी आणखी चौघांना अटक; संशयितांची संख्या ११ वर

पाकिस्तानी नागरिकांना अटक

या तपासात ५२६ किलो बंदी असलेले अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. यात हेरॉईन आणि मेथामफेटामाईन याचा समावेश होता आंतरराष्ट्रीय बाजारात या जप्त केलेल्या अंमली पदार्थाची किंमत ही ३००० कोटी रूपयांच्या वर असल्याचं सांगण्यात येत आहे.

या कारवाईत जहाजावर पाच पाकिस्तानी नागरिकांना देखील अटक करण्यात आली आहे. भारतीय तटरक्षक दलाने जहाज आणि त्याच्या चालक दलाला तसेच जप्त केलेल्या अंमली पदार्थांना मुंबईत पोहचवण्यात आलं. तिथं त्यांची संयुक्तरित्या चौकशी केली जाणार आहे.

Gujarat Drug Bust 2026
Bhusawal Drug Seized | ठाणे अमली पदार्थ प्रकरणाचे धागेदोरे भुसावळपर्यंत; NCB कडून संशयित ताब्यात

समुद्रात मोठी कारवाई

भारतीय तटरक्षक दलाने सांगितल्याप्रमाणे हे ऑपरेशन आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्करी नेटवर्कच्याविरोधातील मोठी कारवाई आहे. समुद्र आणि आकाशातून सतत गस्त घातली जाते संशयास्पद जहाजांची ओळख पटवून त्या रोखल्या जातात. यावेळी भारतीय तटरक्षक दलाने मोठी खेप भारतात पोहचण्यापूर्वीच कारवाई केली आहे. तटरक्षक दलाला मिळालेले हे मोठे यश मानले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news