Naxal Ramdher Majji Surrender: सुरक्षा दलांना आज नक्षलवादाविरूद्धच्या लढाईत एक मोठं यश प्राप्त झालं आहे. हे यश ऐतिहासिक असं म्हटलं जात आहे. कुख्यात नक्षली कमांडर तसंच सेंट्रल कमिटी मेंबर रामधेर मज्जीने आपल्या ११ साथीदारांसह सकाळी छत्तीसगडमध्ये बकरकट्टा इथं पोलिसांसमोर समर्पण केलं.
रामधेर मज्जी हा कुख्यात नक्षली हिडमाच्या तोडीस तोड मानला जात होता. त्याच्या डोक्यावर १ कोटी रूपयाचे बक्षीस होते. त्याने आपल्या साथीदारांसह आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला. यामुळं महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड ही राज्ये एकप्रकारे नक्षलमुक्त झाली आहेत. या क्षेत्रामध्ये नक्षलवादाविरोधातील मोहीमेचा हा एक निर्णायक विजय आहे.
रामधर मज्जी – CCM-AK-47
चंदू उसेंडी – डीवीसीएम – 30 कार्बाइन
ललिता – डीवीसीएम
जानकी – डीवीसीएम – INSAS
प्रेम – डीवीसीएम – AK-47
रामसिंह दादा – ACM – .303
सुकेश पोट्टम – ACM – AK-47
लक्ष्मी – पीएम– INSAS
शीला – पीएम– INSAS
सागर – पीएम– SLR
कविता – पीएम– .303
योगिता – पीएम–
काही दिवसांपूर्वीच हिडमाला सुरक्षा दलांनी चकमकीत ठार केलं होतं. माडवी हिडमा बस्तरच्या भागातील एक कुख्यात नक्षलवादी कमांडर होता. तो सीपीआय माओवादी गटाचा केंद्रीय कमिटीचा सर्वात युवा सदस्य होता. तो PLGA बटालियन-1 एक प्रमुख सदस्य देखील होता.
त्याने २०१० मध्ये ताडमेटला हल्ला, २०१३ चा झीरम घाटी हत्याकांड तसेच २६ मोठ्या हल्ल्याचा तो मास्टर माईंड होता. त्याच्यावर १ कोटी रूपयांचे इनाम देखील होते.
गेल्या महिन्यात १८ नोव्हेंबरला आंध्र प्रदेशच्या अल्लूरी सीताराम राजू जिल्ह्यातील मारेदुमिल्ली जंगलात सुरक्षा दलांनी एका चकमकीत त्याचा एन्काऊंटर केला. या चकमकीत हिडमाची पत्नी राजे सह एकूण सहा नक्षली ठार झाले होते.