Hotel Royal Inn Room 205 case: हॉटेल रॉयल इनमधील रूम नंबर २०५ मध्ये एका प्रेमी जोडप्याचे मृतदेह आढळून आले. २३ वर्षाचा युवराज यादव आणि ३४ वर्षाची भारती अशी मृत झालेल्या जोडप्याची ओळख पटवण्यात आली आहे. युवराज हा उत्तर प्रदेशातील चिरगांवच्या औपरा गावाचा रहिवासी होता तर भारती ही टहरौलीची रहिवासी होती.
या घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी रूम नंबर २०५ चा दरवाजा तोडला. दोघा विष प्राशन करणाऱ्या मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान या दोघांचा मृत्यू झाला. रविवारी दुपारी ही दुखद घटना घडली. या दोघांनी एकत्रच आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला.
हॉटेल रॉयल इनच्या स्टाफला ज्यावेळी रूम नंबर २०५ मधून काहीच हालचाल होत नाहीये असं जाणवलं त्यावेळी त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस अधिकारी लक्ष्मीकांत गौतम यांच्या नेतृत्वाखाली टीम हॉटेलमध्ये दाखल झाली. त्यावेळी त्यांनी २०५ चा दरवाजा तोडला. आता पाहिलं तर भयावह दृष्य दिसलं.
युवराज आणि भारती बेशुद्ध अवस्थेत पडले होते. पोलिसांनी त्वरित दोघांना झांसीच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केलं. मात्र प्राशन केलेलं विष हे शरीरात पसरलं होतं. त्यामुळं डॉक्टर त्यांना वाचवू शकले नाहीत. पोलिसांनी मृतदेह शविच्छेदनासाठी पाठवून दिले आहेत.
मृत युवराज यांचे वडील जयपाल आणि काका कमल सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार युवराज बीए पास झाल्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. त्यांच्या घराजवळच भारती देखील आपल्या पती आणि मुलासोबत रहात होती. भारतीच्या मुलाचा युवराजच्या घरी येणे जाणे होते. त्यामुळं भारतीचा देखील घरातील वावर वाढला होता. याचवेळी युवराज आणि भारती यांच्यात प्रेमसंबंध तयार झाले. याबाबत कुटुंबीयांना कोणतीही कल्पना नव्हती. सकाळी युवराज घरातून निघाला आणि दुपारी त्याच्या मृत्यूची बातमीच येऊन थडकली.
दरम्यान, युवराजच्या कुटुंबीयांनी भारतीवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी ३४ वर्षाच्या भारतीने २३ वर्षाच्या मुलाला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि त्याला ब्रॅकमेल करून त्रास दिला असा आरोप केला. कुटुंबीयांना संशय आहे की या महिलेनेच युवराजला हॉटेलमध्ये बोलवलं आणि आधी विष खायला घातलं. त्यानंतर स्वतः विष प्राशन केलं.
आता पोलीस हॉटेल रेकॉर्ड, कुटुंबीयांची वक्तव्ये यांच्या आधारावर तपास करत आहे जेणेकरून कुटुंबीयांना मृत्यूचे खरे कारण आणि परिस्थितीची स्पष्ट माहिती मिळेल.