Gurugram boyfriend burns girlfriend private parts file photo
राष्ट्रीय

Crime News: भयंकर! प्रियकराने १९ वर्षीय प्रेयसीच्या प्रायव्हेट पार्टवर सॅनिटायझर ओतून पेटवलं; कृत्याचा व्हिडिओही बनवला

Gurugram boyfriend burns girlfriend private parts: एका १९ वर्षीय बी.एस्सी बायोटेक्नॉलॉजीच्या विद्यार्थिनीवर झालेल्या अमानुष अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मोहन कारंडे

Gurugram boyfriend burns girlfriend private parts:

गुरुग्राम: गुरुग्राममध्ये एका १९ वर्षीय विद्यार्थिनीवर झालेल्या अमानुष अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित तरुणीवर सध्या दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुलीच्या प्रियकराने तिच्या गुप्तांगावर सॅनिटायझर ओतून तिला पेटवून दिले आणि व्हिडिओ शूट केला. त्यानंतर तिच्या डोक्यात बाटलीने वार केले, घरातील फर्निचरवर तिचे डोके आपटले आणि नंतर चाकूनेही हल्ला केला. याप्रकरणी शिवम (वय १९, रा. दिल्ली) याला पोलिसांनी अटक केली आहे.

ऑनलाइन डेटिंग ॲपद्वारे तरुणीची शिवमशी ओळख

१९ फेब्रुवारी रोजी रात्री तक्रार दाखल करण्यात आली. पीडितेच्या जबाबावरून नोंदवण्यात आलेल्या एफआयआरनुसार, आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. तसेच तो तिला सतत मारहाण आणि शारीरिक छळ करत असे. पीडित विद्यार्थिनी मूळची त्रिपुराची असून ती गुरुग्राममधील सेक्टर-६९ मधील एका पीजी मध्ये राहून बी.एस्सी बायोटेक्नॉलॉजीचे शिक्षण घेत होती. दिल्लीतील नरेला येथील रहिवासी असलेल्या शिवमशी तिची ओळख एका ऑनलाइन ॲपच्या माध्यमातून झाली होती. सप्टेंबर २०२५ मध्ये त्यांच्यात संवाद सुरू झाला आणि त्याचे रूपांतर प्रेमात झाले.

विवस्त्र व्हिडिओ केले...

पीडितेच्या आरोपानुसार, आरोपी शिवमने तिला लग्नाचे आश्वासन देऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर ते काही काळ गुरुग्राममध्ये एकत्र राहिले. या काळात आरोपी तिच्यावर संशय घेऊ लागला आणि त्याने तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. १६ फेब्रुवारी रोजी आरोपीने पीडितेवर अत्यंत क्रूरपणे हल्ला केला. त्याने स्टीलच्या बाटलीने तिच्या डोक्यावर वार केले, तिचे डोके भिंतीवर आणि फर्निचरवर आदळले, तिला मातीच्या माठाने मारले आणि तिच्या गुप्तांगावर सॅनिटायझर ओतून तिला जाळण्याचा प्रयत्न केला.

इतकेच नाही तर, आरोपीने तिच्या पायावर चाकूने वार केले आणि तिला धमकी दिली की, "मी तुला इतकी मारहाण करेन की तू कधीही चालण्यालायक किंवा आई होण्यालायक उरणार नाहीस." आरोपीने तिचे विवस्त्र व्हिडिओही रेकॉर्ड केल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

अशी झाली पीडितेची सुटका

'एएनआय'ने दिलेल्या वृत्तानुसार, १८ फेब्रुवारीच्या रात्री, पीडितेने आरोपीचा फोन वापरून आपल्या आईला फोन केला आणि बंगाली भाषेत सर्व प्रकार सांगितला. आरोपीला बंगाली भाषा समजत नसल्याने तिला हे शक्य झाले. त्यानंतर तिच्या आईने '११२' क्रमांकावर फोन करून पोलिसांना कळवले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पीडितेची सुटका केली आणि तिला रुग्णालयात दाखल केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT