lioness lion fight save cub lion wild animal attack video
पुढारी ऑनलाईन :
सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. यात एका आईची माया आणि तिची ताकद पाहायला मिळते. आपल्या बाळाला वाचवण्यासाठी एक सिंहिण थेट सिंहाशी भिडताना दिसते.
सोशल मीडियावर दररोज प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडिओ पाहायला मिळतात. सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओने हे पुन्हा सिद्ध केले आहे की, आई ही सर्वात मोठी योद्धा असते आणि ती आपल्या लेकरासाठी काहीही करू शकते. या व्हिडिओमध्ये एक आई आपल्या बाळाला वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावताना दिसते.
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसते की, सिंहिण उन्हात आपल्या पिल्लासोबत बसलेली आहे. तलावाच्या काठावर सिंहिण आणि तिचा शावक निवांत पडलेले असतात. त्याच वेळी अचानक पिल्लू पाण्यात पडते आणि बुडू लागते. हे पाहून सिंहिण घाबरते आणि लगेच त्याला वाचवण्यासाठी धाव घेते. ती आपल्या तोंडात पिल्लाला पकडून पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करते.
सिंहाचा सिंहिणीवर हल्ला
सिंहीण आपल्या पिल्लाला वाचवण्याचा प्रयत्न करत असतानाच मागून एक सिंह तिच्यावर हल्ला करतो. मात्र, आपल्या बाळासाठी सिंहिण इतक्या जोरात पलटवार करते की तो सिंह तिथून पळ काढतो.
व्हायरल झाला व्हिडिओ
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ (X) वर शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “आईच्या मिशनमध्ये कोणतीही अडचण अडथळा ठरू शकत नाही.” हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला असून त्यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत.
एका युजरने लिहिले की, “सिंहाने तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला, पण तिने त्याला चांगलाच धडा शिकवला.” तर दुसऱ्या युजरने लिहिले की, “सिंहाने चुकीचा पंगा घेतला.”
हा व्हिडिओ नेमका कधी आणि कुठला आहे, याची अद्याप पुष्टी झालेली नाही. इंटरनेटवर मिळालेल्या माहितीवरून आणि व्हिडिओवरून ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे इतकाच याचा उद्देश आहे.