‘जंगलचा राजा’ सिंहिणीला का घाबरतो?

lion afraid of lioness
‘जंगलचा राजा’ सिंहिणीला का घाबरतो?File Photo
Published on
Updated on

अहमदाबाद : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ जबरदस्त व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक सिंहीण एका सिंहावर जोरदार गर्जना करीत रागवताना दिसत आहे. हा व्हायरल व्हिडीओ गुजरातमधील गीर या राष्ट्रीय प्राणी उद्यानातील आहे. गुजरातच्या टुरिझम टीमने गीर राष्ट्रीय उद्यानातील या सिंह आणि सिंहिणीमधील एक मनमोहक क्षण सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर, ‘पाहा जंगलाच्या राजालाही माहीत आहे की, रागावलेल्या राणी समोर माघार घेऊन शांत राहणे ही एक हुशार चाल आहे’, अशा गोड कमेंटस् वापरकर्त्यांनी केल्या आहेत. सोशल मीडियावर सिंह आणि सिंहिणीचे असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ पाहून तुम्हाला कधी न कधी हा प्रश्न पडलाच असेल की, जंगलाचा राजा असूनसुद्धा एक भल्या मोठ्या शरीराचा सिंह सिंहिणीला कसा काय घाबरतो? तिच्यापुढे कशी काय माघार घेऊ शकतो? चला तर मग प्राणी तज्ज्ञांकडून जाणून घेऊया यामागचे मूळ कारण.

प्राणी तज्ज्ञ सांगतात की, सिंहाची झुंड मुळातच ‘मातृसत्ताक’ असते. झुंडीतील नर पूर्ण काळ कळपात राहत नाहीत; पण सिंहिणी आयुष्यभर एकाच कळपात राहतात. त्यामुळे कळपाचे संपूर्ण नियंत्रण आणि निर्णयप्रक्रियेत फक्त सिंहिणींचे वर्चस्व अधिक असते. एका संशोधनानुसार असे समोर आले की, सिंह आळशी असतो. बहुतांश वेळा सिंहिणीने केलेल्या शिकारीवरच तो अवलंबून असतो. म्हणूनच जर त्याने सिंहिणीला जास्त त्रास दिला, तर ती त्याला अन्नापासून लांब ठेवू शकते किंवा पूर्ण झुंड त्यांच्याविरुद्ध होऊ शकते. तसेच सिंह वजनाने आणि ताकदीने एका सिंहिणीपेक्षा मोठा असला, तरी त्याने एखाद्या सिंहिणीवर अन्याय केला, तर कळपातील इतर सिंहिणी एकत्र येऊन त्याच्यावर हल्ला करतात.

अशा संघटित हल्ल्यात सिंह गंभीर जखमी होऊ शकतो, याच कारणाने सिंह सिंहिणीशी विनाकारण झगडणे टाळतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सिंहीण तिच्या पिलांच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील आणि आक्रमक असते. जर सिंहाने पिलांना इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केला, तर सिंहीण तिच्या प्राणांची पर्वा न करता त्याच्याशी लढते. बर्‍याचदा जेव्हा सिंह झुंडीचा ताबा घेतो तेव्हा, तो झुंडीतील पिलांना मारण्याचा प्रयत्न करतो. अशावेळी त्या झुंडीतील सिंहिणी एकत्र येऊन त्याचा प्रतिकार करतात. म्हणूनच सिंह सिंहिणींशी पंगा घेणे टाळतात. तसेच कोणताही सिंह सिंहिणींच्या संमतीशिवाय झुंडीत दीर्घकाळ टिकू शकत नाही.

नॅशनल जिओग्राफीच्या एका माहितीपटात असे नमूद केले आहे की, सिंह हा उंचीने मोठा असतो. जर तो ताठ मानेने सिंहिणीसमोर आला तर ते आक्रमकतेचे लक्षण मानले जाऊ शकते. म्हणूनच सिंह सिंहिणीच्या जवळ जाताना त्याने डोके झुकवतो आणि सिंहिणीच्या डोक्याला किंवा खांद्याला घासतो. या ‘हेड रबिंग’ असे म्हटले जाते. ज्यामुळे सिंहिणीला तिला धोका आहे असे वाटणार नाही आणि ती त्याच्यावर हल्ला करणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news