Lawrence Bishnoi Gang Lady Don:
दिल्ली पोलिसांच्या विशेष गुप्तचर विभागानं लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंधित असलेल्या खुसनुमा अन्सारी उर्फ नेहा या महिलेला अटक केली. नेहा ही कुख्यात बॉबी कबूतरची अनेक काळापासूनची पार्टनर होती. तो एक हाय प्रोफाईल शूटर असून गँगला शस्त्र पुरवण्यात त्याची मोठी भूमिका होती. त्याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यांचा सिद्धू मुसेवाला पासून दिशा पटानीच्या घरावरील हल्ला अशा अनेक हाय प्रोफाईल गुन्ह्यात सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे.
बॉबी कबूतर उर्फ महफूज अली हा लॉरेन्स बिश्नोई गँगचा प्रमुख लॉजेस्टिक पार्टनर असल्याचा पोलिसांचा दावा आहे. याचबरोबर बॉबी कबूतर हा हशीम बग्गा गँगशी देखील कनेक्टेड होता. बॉबी कबूतर हा पाकिस्तानच्या आयएसआयशी संबंधित असलेल्या आणि भारतातील सर्वात मोठा अवैध शस्त्र तस्कर सलीम पिस्टल याच्याकडून उच्च दर्जाची शस्त्रे खरेदी करत होता अशी माहिती तपास यंत्रणांनी दिली.
ही शस्त्रे अनेक हाय प्रोफाईल गुन्ह्यात वापरले गेल्याचा पोलिसांना संशय आहे. यात सिद्धू मुसेवाला शूटिंग, दिशा पटानीच्या घरावरील हल्ला, नादिर शाह खून प्रकरण आणि सीलामपूर डबल मर्डरमध्ये देखील ही शस्त्रे वापरण्यात आली.
दुसरी गोष्ट म्हणजे बिश्नोई गँगच्या कारवाईत महिलांचा वाढती भूमिका हा देखील नवीन ट्रेंड आहे. नेहा ही या गँगशी संबंधित असलेली तिसरी लेडी डॉन आहे. यापूर्वी दिपा आणि झोया खान यांचा देखील यात समावेश होता.
समाजासमोर नेहा ही उत्तर दिल्लीत एक ब्युटी पार्लर चालवणारी एक पार्लरवाली आहे. मात्र पोलिसांनी दावा केला आहे की हा तिचा व्यवसाय एक मुखवटा आहे. आपल्या गँगच्या अनधिकृत गोष्टी झाकण्याचा मुखवटा आहे. या आडून ती गँगचे ड्रग्जची वितरण व्यवस्था चावलते. नेहा आणि बॉबी हे सात वर्षापासून एकत्र आहेत. दरम्यान, महिपालपूर इथल्या फ्लाय ओव्हरजवळ यांना अटक केल्यानंतर पोलिसांनी यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज हस्तगत केले होते. तपास यंत्रणांनी या महिला डॉनला मॅडम जहेर असं संबोधलं.
या सर्वांची अटक झाल्यावर काही नवीन माहिती देखील समोर येत आहे. २०२२३ मधील पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या हत्येबाबत ही माहिती आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बॉब कबूतरने मूसेलवालाची हालचाल टिपण्यासाठी सर्वात आधी रेकी केली होती. त्यानंतर त्यानं शूटर्सना महत्वाची माहिती पुरवली होती.
तो शाहरूखशी सतत संपर्कात होता. शाहरूख हा या प्लॅनिंगमधला दुसरा गँगस्टर होता. बॉबी हा अनेक दिवसांपासून विशेष पथकाला चकवत होता. तो यासाठी फेक ओळखपत्र वापरत होता आणि सतत आपले ठिकाण बदलत होता.
दरम्यान, विशेष तपास पथकानं टेक्निकल सर्वेलन्स आणि गुप्तचर माहितीचा वापर केला. आता बॉबी आणि नेहा दोघेही पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस यांच्याकडून गँगबाबतची अधिकची माहिती, आर्थिक मार्ग आणि दिल्लीतील स्लीपर सेल याबाबत मिळवण्यासाठी त्यांची चौकशी करत आहेत.