

Singer B Praak Threat: प्रसिद्ध गायक बी प्राक यांना धमकी दिल्याची बातमी समोर आली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगने १० कोटी खंडणी मागितली आहे. त्यांनी ऑडिओ रेकॉर्डिंग पाठवून पंजाबी गायक दिलनूरकडे ही धमकी दिली.
६ जानेवारी रोजी दुपारी हे ऑडिओ रेकॉर्डिंग पाठवण्यात आले. यापूर्वी ५ जानेवारी रोजी प्राक याला दोनवेळा कॉल आला होता. मात्र दिलनूरने हा कॉल रिसिव्ह केला नव्हता. ६ जानवारी रोजी एका परदेशी क्रमांकावरून कॉल करण्यात आला. दिलनूरने याबाबत तक्रार दाखल केली असून त्यांनी ज्यावेळी कॉल उचलला त्यावेळी समोरून बोलणाऱ्याचे संभाषण विचित्र वाटलं म्हणून त्यांनी फोन कट केला. त्यानंतर दिलनूर यांना व्हॉईस मेसेज आला. यानंतर मोहालीमध्ये याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
बी प्राक यांना धमकी देणाऱ्या कॉलरने आपलं नाव आरजू बिश्नोई असं सांगितलं. आरजू बिश्नोई हा लॉरेन्स बिश्नोई गँगचा आहे तो विदेशात लपून बसला आहे. त्याने फोनकरून धमकी दिली की, मी आरजू बिश्नोई बोलत आहे. बी प्राकला मेसेज कर की त्याला १० कोटी रूपये द्यायचे आहेत. तुझ्याकडे यासाठी फक्त एका आठवड्याचा वेळ आहे.
तू कोणत्याही देशात जा. तुझ्या जवळ कोणीही असलं तरी त्याला इजा पोहचवली जाईल. याला फेक कॉल समजू नका. ऐकलं तर ठीक नाहीतर त्याला सांग की धुळीस मिळवून टाकू. हा मेसेज मिळताच दिलनूरने ६ जानेवारी रोजी एसएसपी मोहाली यांच्याकडे लेखी तक्रार केली. याचा तपास सुरू आहे.
बी प्राक हे बॉलीवूडचे एक मोठे नाव आहे. त्याचे खरे नाव हे प्रतीक बच्चन आहे. तो मेलोडी आणि ह्रदयाला स्पर्श करणाऱ्या गाण्यांसाठी प्रसिद्ध आहे. संगीत क्षेत्रात त्याने एक संगीतकार म्हणून कारकीर्द सुरू केली होती. त्यानंतर मन भरया या गाण्याद्वारे त्याने गायन क्षेत्रात प्रेश केला. त्याने केसरी, गुड न्यूज, शेरशाह सारखी गाणी दिली आहेत.
बी प्राकने तेरी मिट्टी, फिलहाल, फिलहाल २ मोहमब्बत, रांझा, मन भरया ही हीट गाणी दिलेली आहेत.