राष्ट्रीय

चट मंगनी पट ब्याह ! लालू प्रसाद यादवांचे चिरंजिव तेजस्वी यादव विवाहबंधनात

स्वालिया न. शिकलगार

पाटणा; पुढारी ऑनलाईन

राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांचे धाकटे चिरंजिव आणि बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव विवाह बंधनात अडकले. तेजस्वी यादव यांनी एअरहोस्टेस एलेक्सिसशी विवाह केला. तेजस्वी आणि एलेक्सिस दोघे एकमेकांना ६ वर्षांपासून ओळखतात. ते जुने मित्रही आहेत. साखरपुड्यानंतर यादव यांना ब्रेक हवा होता. पण, त्यांनी साखरपुड्याच्या दुसऱ्या दिवशी लग्न केलं.

तेजस्वी यांचा साखरपुडा आणि लग्न दिल्लीतील सैनिक फार्म येथे पार पडले. सैनिक फार्म त्यांची बहिण मीसा भारती यांचं आहे.

पिंक-ब्ल्यू थीम ने सजवलं लग्नठिकाण

साखरपुड्याचं ठिकाण पिंक आणि ब्ल्यू रंगाच्या थीमने सजवण्यात आलं होतं. गेटच्या एंट्रीवर पांढऱ्या-गुलाबी फुलांनी सजावट करण्यात आली. आत एक भव्य स्टेज तयार करण्यात आलं होतं. फुलांना सजवलेलं हा स्टेज होता. यावेळी शाही भोजन देखील ठेवण्यात आलं होतं. जेवणात अनेक डेजर्ट ठेवण्यात आले होते.

कोण आहे एलेक्सिस?

तेजस्वी यांची पत्नी एलेक्सिस आदी एयरहोस्टेस होती. ती दिल्लीतील वसंत विहार येथे राहते. तिचे वडील चंडिगढच्या एका शाळेचे मुख्याध्यापक होते. सूत्रांच्या माहितीनुसार, एलेक्सिस -तेजस्वी यांच्यात गाठीभेटी असायच्या. आता त्यांच्या मैत्रीला ६ वर्षे पूर्ण झाले आहेत. लालू तेजस्वी यांच्या या निर्णयाने खुश नव्हते. ते नाराज होते.

रोहिणी आचार्यने दिला होता लग्नाचा इशारा

तेजस्वी यांची बहिण रोहिणी आचार्य यांनी ट्विटच्या माध्यमातून आज लग्नाचा इशारा केला होता. ट्विट करून त्यांनी लग्नाचे फोटो शेअर केले. throwing a kissHugging face congratulations tutu nd Rachel Face throwing a kissWishing you both a lifetime of happiness!TulipClinking glasses. आणखी एका ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय -Lots of love, blessings and happiness for my newly married couple Two hearts. याचबरोबर, त्यांनी लग्नातील काही फोटो ट्विट केले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT