राष्ट्रीय

lakhimpur kheri : रस्त्यावर चिरडलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना ४५ लाखांची मदत

backup backup

लखिमपूर; पुढारी ऑनलाईन : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी lakhimpur kheri येथे हिंसाचाराच्या प्रकरणात शेतकरी आणि प्रशासन यांच्यात समेट झाल्याचे वृत्त आहे. मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना 45-45 लाख रुपये मिळतील आणि सरकारी नोकरी दिली जाईल. तसेच जखमींना १० लाखांची मदत केली जाईल. त्याचबरोबर उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश या प्रकरणाची चौकशी करतील. रविवारी लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला.

सोमवारी घटनास्थळी जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या सर्व प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांना थांबवण्यात आले किंवा त्यांना ताब्यात घेण्यात आले. तिकोनिया येथील आंदोलक शेतकऱ्यांचा एक गट केंद्रीय मंत्री अजयकुमार मिश्रा आणि यूपीचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना रोखण्याचा प्रयत्न केल्यावर हिंसाचार उसळला.

केंद्रीय मंत्री मिश्रा यांच्या नुकत्याच झालेल्या भाषणामुळे आंदोलक शेतकरी संतप्त झाले होते. मंत्र्यांचा ताफ्यातील एक कार आंदोलकांवर धावल्यानंतर हिंसाचार झाल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे.

lakhimpur kheri : खुनाचा गुन्हा दाखल 

lakhimpur kheri यूपी पोलिसांनी लखीमपूर हिंसाचार प्रकरणात केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रासह 14 जणांविरोधात एफआयआर नोंदवला आहे.

यूपी पोलिसांनी कलम 302, 120 बी आणि इतर कलमांखाली हा गुन्हा दाखल केला आहे. लखीमपूर lakhimpur kheri हिंसाचारात रविवारी 4 शेतकऱ्यांसह 8 लोकांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर मंत्र्यांच्या वतीने पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांचा मुलगा आणि इतरांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लखीमपूर खेरी येथे एका कारने शेतकऱ्यांना चिरडल्याप्रकरणी हा एफआयआर नोंदवण्यात आला आहे. लखीमपूर हिंसाचारात lakhimpur kheri चार शेतकऱ्यांसह आठ जण ठार झाले. केंद्रीय मंत्र्यांच्या विरोधात उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यात हजारो शेतकरी जमले होते.

राकेश टिकैत घटनास्थळी पोहोचले

दुसरीकडे, भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत घटनास्थळी पोहोचले आहेत. लखीमपूर खेरीला रवाना झालेल्या काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

एएनआयच्या वृत्तानुसार, लखीमपूर खेरीच्या lakhimpur kheri टिकुनिया येथे रविवारी झालेल्या हिंसाचारासाठी शेतकऱ्यांनी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी आणि त्यांचा मुलगा आशिष मिश्रा टेनी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शेतकरी नेत्यांनी आरोप केला होता की, मंत्र्याच्या मुलाच्या ताफ्यात समाविष्ट असलेल्या वाहनांनी आंदोलक शेतकऱ्यांना चिरडले.

त्याचवेळी लखनऊमध्ये सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्या बाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. अखिलेश यादव आज लखीमपूर खेरीला रवाना होणार होते, जिथे ते हिंसाचारात बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना भेटणार होते. मात्र, पोलिसांनी विक्रमादित्य मार्गावरील त्यांच्या घराबाहेर मोठा फौजफाटा तैनात केला आहे.

हे ही वाचलं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT