राष्ट्रीय

LPG Cylinder Price : महिन्याच्या सुरूवातीलाच आनंदवार्ता; LPG सिलिंडर झाला स्वस्त, जाणून घ्या नवे दर

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान सुरू असतानाच आणि महिन्याच्या सुरूवातीलाच एलपीजी सिलिंडर ग्राहकांसाठी आनंदवार्ता आहे. सलग तिसऱ्या महिन्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती कमी झाल्या आहेत. ऑइल मार्केटिंग पेट्रोलियम कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरची किंमत ७२ रुपयांनी कमी केली आहे.

आज १ जूनपासून एलपीजी सिलिंडर दिल्लीत ६९.५० रुपयांनी, कोलकात्यात ७२ रुपयांनी, मुंबईत ६९.५० रुपयांनी आणि चेन्नईमध्ये ७०.५० रुपयांनी स्वस्त झाला आहे. हा बदल केवळ व्यावसायिक सिलिंडरमध्ये झाला आहे. घरगुती एलपीजी सिलिंडर जुन्या दरानेच उपलब्ध असेल. यापूर्वी, एप्रिल आणि मेच्या सुरुवातीलाही ग्राहकांना दिलासा मिळाला होता.

लोकसभा निवडणूक २०२४ च्या शेवटच्या टप्प्यात आज ७ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील ५७ जागांसाठी मतदान सुरू आहे. याआधीही १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आली आहे. आजपासून हा निळा सिलेंडर दिल्लीत १७४५.५० रुपयांऐवजी १६७६ रुपयांना मिळणार आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT