Government Job News pudhari
राष्ट्रीय

Government Job News: आश्चर्य अन् निराशा! सरकारी नोकरीसाठी ३९ व्या वर्षी दिलेल्या परीक्षेचं ६० व्या वर्षी मिळालं निवडपत्र...

Anirudha Sankpal

Government Job News: केरळममधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका ६१ वर्षाच्या पुरूषाला तब्बल २० वर्षानंतर त्याने अर्ज केलेल्या सरकारी नोकरीसाठी Appointment Letter मिळालं. मिळालेल्या माहितीनुसार मातृभूमी इंग्लिश शाळेतील शिक्षक अब्दुल माजीद यांना केरळ पब्लिक सर्व्हिस कमिशन (PSC) कडून अॅडव्हाईस मेमो मिळाला. त्यांना पार्ट टाईम ज्युनियर अरेबिक टीचर म्हणून नियुक्ती देण्यात आली होती. मात्र यासाठी त्यांनी तब्बल २० वर्षापूर्वी म्हणजे २००५ मध्ये अर्ज केला होता.

२००५ मध्ये दिली होती परीक्षा

माजीद यांनी या पोस्टसाठी पीएससी परीक्षा २००५ मध्ये दिली होती. त्यांची रँक लिस्ट ही पुढची तीन वर्षे वैध होती. ही वैधता २००८ मध्ये संपुष्टात आली. मात्र अश्चर्यकारकरित्या पीएससीने माजीद यांना वैधता संपल्यानंतर तब्बल १८ वर्षांनी २४ एप्रिल २०२६ रोजी अॅडव्हाईस मेमो पाठवला.

आश्चर्याचा धक्का अन् निराशा

ज्यावेळी माजीद यांना नियुक्तीपत्र आले त्यावेळी त्यांना अश्चर्याचा धक्का बसला. मात्र त्यानंतर निराशा देखील झाली. अधिकृत नोंदीनुसार माजीद २७ मे २०२६ रोजी ६० वर्षाचे झाले. त्यामुळं सध्या अस्तित्वात असलेल्या नियमानुसार ते सरकारी नोकरीसाठी ते पात्र ठरत नाहीत.

या अजब घटनेबाबत बोलताना माजीद म्हणाले, 'ही जागा १८ वर्षे भरली गेलेलीच नव्हती. या दिरंगाईमुळं माझी नोकरीची संधी गेली. आता मी वयाची मर्यादा आलोंडली आहे. त्यामुळं आता ती नोकरी मला मिळण्याची शक्यता नाही.'

वयाबाबतही गोंधळ

माजीद यांनी त्यांच्या जन्म दाखल्याबाबत देखील साशंकता व्यक्त केली आहे. SSLC च्या प्रमाणपत्रानुसार माजिद हे २७ मे १९६६ रोजी जन्मले आहेत. मात्र त्यांना दावा केला की त्यांचा जन्म हा २७ मे १९६७ रोजी झाला आहे.

माजीद यांना जर त्यांच्या या वयाच्या बाबतचा गोंधळ ठीक केला तर एक वर्षे सरकारी नोकरी करता येईल असा दावा केला आहे. माजीद यांनी केरळ शिक्षण मंत्र्यांकडे मी माझी याचिका दाखल केली आहे. आता त्यांच्याकडून मला कोणती प्रतिक्रिया येते याची ते वाट पाहत आहेत.

मातृभूमी शाळेच्या मते पात्र उमेदवार मिळाला नाही त्यामुळं हे पद अनेक वर्षे रिक्त होते. जरी याची रँक लिस्ट २००८ मध्ये अवैध झाली असली तरी ही रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया बऱ्याच वर्षांनी करण्यात आली. त्यानंतर माजीद यांना २०२६ मध्ये नियुक्ती पत्र मिळाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT