Kashmir Winter Tourism Pudhari
राष्ट्रीय

Kashmir Winter Tourism: काश्मीरमध्ये बर्फाची जादू; गुलमर्ग, सोनमर्गमध्ये पर्यटकांची विक्रमी गर्दी

ताज्या बर्फबारीमुळे हिवाळी पर्यटनाला चालना; गुलमर्गमधील हॉटेल्स 100 टक्के भरली

पुढारी वृत्तसेवा

जम्मू : अनिल साक्षी

काश्मीर खोऱ्यात झालेल्या ताज्या बर्फबारीमुळे येथील हिवाळी पर्यटनाला मोठी चालना मिळाली असून, गुलमर्ग आणि सोनमर्गसारख्या प्रसिद्ध पर्यटनस्थळांवर पर्यटकांची प्रचंड गर्दी होत आहे. बर्फाच्छादित निसर्गाचा आनंद घेण्यासाठी देश-विदेशांतून पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होत असल्याने हॉटेल व्यावसायिकांचे चांगलेच दिवस आले आहेत. गुलमर्गमधील हॉटेल्स सध्या तब्बल 100 टक्के भरले असून, सोनमर्गमध्येही सुमारे 70 टक्के ऑक्युपन्सी नोंदवली जात आहे.

काश्मीरच्या निसर्गाला तोड नाही...

पर्यटकांचे म्हणणे आहे की काश्मीरमधील बर्फाळ निसर्गाला तोड नाही. अनेकांनी या ठिकाणांची तुलना आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळांशी करत काश्मीर अधिक सुंदर असल्याचे मत व्यक्त केले. गुजरातहून आलेल्या स्कीअर खुशबू यांनी सांगितले की, त्यांनी अनेक ठिकाणी स्कीईंग केली असली, तरी गुलमर्गचा अनुभव सर्वश्रेष्ठ आहे. ‌‘गुलमर्ग म्हणजे खरंच पृथ्वीवरील स्वर्ग आहे,‌’ असे त्या म्हणाल्या.\

पंजाबमधून आलेल्या पर्यटकांच्या एका गटाने सहा दिवसांचा स्कीईंग ॲडव्हेंचर पूर्ण केल्यानंतर इतरांनाही गुलमर्गला भेट देण्याचे आवाहन केले. पहिल्यांदाच काश्मीरला आलेल्या सानिया हिने स्कीईंग आणि गोंडोला राईडचा आनंद घेतल्याचे सांगत, येथील लोक आणि हवामान अतिशय छान असल्याचे नमूद केले.

गुलमर्गमध्ये साहसी पर्यटनावर भर

गुलमर्ग डेव्हलपमेंट ॲथॉरिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तारिक हुसेन यांनी बर्फबारीनंतर हॉटेल्स 100 टक्के भरल्याची पुष्टी केली. त्यांनी पर्यटकांना हिवाळी साहसी क्रीडा उपक्रमांचा आनंद घेण्याचे आवाहन करताना, सुरक्षेच्या दृष्टीने ठरवलेल्या स्की ट्रॅकचाच वापर करण्याचा सल्ला दिला आहे.

जम्मू : अनिल साक्षी

काश्मीर खोऱ्यात झालेल्या ताज्या बर्फबारीमुळे येथील हिवाळी पर्यटनाला मोठी चालना मिळाली असून, गुलमर्ग आणि सोनमर्गसारख्या प्रसिद्ध पर्यटनस्थळांवर पर्यटकांची प्रचंड गर्दी होत आहे. बर्फाच्छादित निसर्गाचा आनंद घेण्यासाठी देश-विदेशांतून पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होत असल्याने हॉटेल व्यावसायिकांचे चांगलेच दिवस आले आहेत. गुलमर्गमधील हॉटेल्स सध्या तब्बल 100 टक्के भरले असून, सोनमर्गमध्येही सुमारे 70 टक्के ऑक्युपन्सी नोंदवली जात आहे.

काश्मीरच्या निसर्गाला तोड नाही...

पर्यटकांचे म्हणणे आहे की काश्मीरमधील बर्फाळ निसर्गाला तोड नाही. अनेकांनी या ठिकाणांची तुलना आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळांशी करत काश्मीर अधिक सुंदर असल्याचे मत व्यक्त केले. गुजरातहून आलेल्या स्कीअर खुशबू यांनी सांगितले की, त्यांनी अनेक ठिकाणी स्कीईंग केली असली, तरी गुलमर्गचा अनुभव सर्वश्रेष्ठ आहे. ‌‘गुलमर्ग म्हणजे खरंच पृथ्वीवरील स्वर्ग आहे,‌’ असे त्या म्हणाल्या.

पंजाबमधून आलेल्या पर्यटकांच्या एका गटाने सहा दिवसांचा स्कीईंग ॲडव्हेंचर पूर्ण केल्यानंतर इतरांनाही गुलमर्गला भेट देण्याचे आवाहन केले. पहिल्यांदाच काश्मीरला आलेल्या सानिया हिने स्कीईंग आणि गोंडोला राईडचा आनंद घेतल्याचे सांगत, येथील लोक आणि हवामान अतिशय छान असल्याचे नमूद केले.

गुलमर्गमध्ये साहसी पर्यटनावर भर

गुलमर्ग डेव्हलपमेंट ॲथॉरिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तारिक हुसेन यांनी बर्फबारीनंतर हॉटेल्स 100 टक्के भरल्याची पुष्टी केली. त्यांनी पर्यटकांना हिवाळी साहसी क्रीडा उपक्रमांचा आनंद घेण्याचे आवाहन करताना, सुरक्षेच्या दृष्टीने ठरवलेल्या स्की ट्रॅकचाच वापर करण्याचा सल्ला दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT