social media ban pudhari
राष्ट्रीय

social media ban: कर्नाटक राज्य सरकारचा मोठा निर्णय... १६ वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर घालणार बंदी

Anirudha Sankpal

social media ban Karnataka Government: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या यांनी आज (दि. ६ मार्च) रोजी कर्नाटक सरकार हे राज्यातील १६ वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर बंदी आणण्याचा विचार कत असल्याचं जाहीर केलं. ते आज राज्याचे २०२६-२७ चा वार्षिक अर्थसंकल्प सादर करत होते. त्यावेळी त्यांनी याबाबतची माहिती दिली.

सिद्धारामैय्या म्हणाले, '१६ वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर बंदी घालण्यात येणार आहे. या मुलांवर मोबाईलच्या वापराचा दुष्परिणाम होत असल्याचं दिसत आहे. ही बंदी मुलांवर मोबाईलच्या अतिरिक्त वापारामुळं होणाऱ्या नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी घालण्यात आली होती.'

सिद्धरामैय्या पुढे म्हणाले, 'IISC अंतर्गत AI आणि टेक पार्क हे तयार करण्यात येणार आहेत. त्यांनी बेंगलोर रोबोटिक्स आणि AI इनोव्हेशन झोन नावाने रोबोटिक्स आणि AI कॅम्पस देखील तयार करण्यात येतील. यासाठी इस्त्रो आणि केओनिक्स यांची देखील मदत घेतली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

सिद्धारामैय्या यांनी आपला १७ वा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर टीका देखील केली. केंद्र सरकार राज्यांवर अन्याय करत आहे. ते घटनेच्या संघराज्यीय पद्धतीप्रमाणे काम करत नाहीये असं म्हणाले.

सिद्धारामैय्या म्हणाले की, राज्य सरकार कल्याणकारी योजना आणि पायाभूत सोई सुविधांचा समतोल साधत विकासाची रणनिती आखत आहे. दीर्घ कालीन आर्थिक विकासासाठी आम्ही केंद्र सरकारला आमच्या राज्याच्या मागणीकडे अजून संवेदनशीलतेने पहावे अशी विनंती करतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT