kangana ranaut fc insta page
राष्ट्रीय

कंगना यांना महाराष्ट्र सदन आवडले, मुख्यमंत्र्यांची खोली न मिळाल्याने आता बदलला इरादा?

महाराष्ट्र सदन फारच आवडले; कंगना यांची मागणी पाहून उंचावल्या भूवया

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार कंगना रणौत यांनी आज दिल्लीतील नव्या महाराष्ट्र सदनात राहण्याची इच्छा व्यक्त केली. संसद अधिवेशाच्या पहिल्या दिवशी विशेष खोलीची मागणी त्यांनी त्या महाराष्ट्र सदनात दाखल झाल्या होत्या.

कंगना यांना महाराष्ट्र सदन फारचं आवडले. त्यानंतर कंगना रणौत यांनी दिल्लीतील नव्या महाराष्ट्र सदनात राहण्याची इच्छा व्यक्त केली होती.

निवासासाठी दुसऱ्या खोल्या छोट्या असल्याने मुख्यमंत्र्यांसाठीच्या प्रशासनाकडे केली; मात्र प्रशासनाने सदर खोली देण्यास नकार दिल्याचे समजते. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्र सदनामध्ये राहण्याचा निर्णय बदलल्याचे सांगण्यात येते.

खरे तर त्यांनी हिमाचल प्रदेशसाठीच्या भवनामध्ये किंवा संसद प्रशासनाने दिलेल्या निवासस्थानी राहणे अपेक्षित होते. परंतु, त्यांनी महाराष्ट्र सदनात राहण्याची इच्छा व्यक्त केल्याने सदन प्रशासनाच्याही भुवया उंचावल्या. महाराष्ट्र सदन खूप सुंदर आहे, माझे काही मित्र इथे असल्याने त्यांना भेटायला आल्याचे सदानातून बाहेर पडताना कंगना यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT