राष्ट्रीय

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या पत्नी अनिता गोयल यांचे कॅन्सरने निधन

Sonali Jadhav

पुढारी ऑनलाईन डेस्क : जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या पत्नी अनिता गोयल (Naresh Goyal Wife Death) यांचे आज(दि.१६) पहाटे मुंबईत निधन झाले. त्या दीर्घकाळ कॅन्सरशी झुंज देत होत्या. त्यांच्या मागे पती नरेश गोयल आणि मुले नम्रता आणि निवानअसा परिवार आहे. नरेश गोयल हे देखील कॅन्सरचे रुग्ण असून ते सध्या जामिनावर बाहेर आहेत.

नरेश गोयल त्यांच्या पत्नीच्या शेवटच्या क्षणी सोबत

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या पत्नी अनिता गोयल या दीर्घकाळ कॅन्सरने त्रस्त होत्या. आज पहाटे तीनच्या सुमारास मुंबईतील एका रुग्णलयात त्यांचे निधन झाले. नरेश गोयल यांना १ सप्टेंबर मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. कॅन्सरग्रस्त गोयल यांनी  या महिन्याच्या सुरुवातीला पत्नीसोबत राहण्यासाठी मानवतावादी आधारावर मुंबई उच्च न्यायालयात  अंतरिम जामीन मागितला होता. जामीन मिळाल्यापासून ते पत्नीसोबत होते.  अनिता गोयल यांनी अखेरचा श्वास घेतला तेव्हा नरेश गाेयल त्यांच्यासोबत होते. (Naresh Goyal Wife Death)

नरेश गोयल यांच्यावर कोणता खटला प्रलंबित आहे?

'ईडी'ने नरेश गोयल यांना गेल्या वर्षी १ सप्टेंबरमध्ये मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली होती. कॅनरा बँकेच्या तक्रारीनंतर सीबीआयने हा गुन्हा दाखल केला होता. नरेश गोयल यांच्यावर ७,००० कोटी रुपयांच्या कथित फसवणुकीचा आरोप आहे. सीबीआयने नोंदवलेल्या 'एफआयआर'च्या आधारे ही अटक केली होती. न्यायालयाने ६ मे रोजी वैद्यकीय कारणास्तव त्‍यांना  अंतरिम जामीन मंजूर केला होता.

नरेश गोयल तुरुंगात असताना त्यांना कॅन्सरचे झाल्याचे निदान झाले. नरेश गोयल यांना न्यायालयात हजर केले असता वैद्यकीय कारणास्तव जामीन मंजूर करण्याची विनंती त्‍यांनी. फेब्रुवारीमध्ये जेव्हा त्यांची काही छायाचित्रे व्हायरल झाली  तेव्हा ते चर्चेचा विषय बनले हाेते.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT