श्रीनगर ; पुढारी ऑनलाईन: Jammu and Kashmir जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलाने जोरदार मोहिम उघडली आहे. Jammu and Kashmir जम्मू-काश्मीरमधील नागबेरन त्राल येथील जंगल परिसरात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाने जैश-ए-मोहम्मद तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. दरम्या, गुरुवार झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले होते.
अवंतीपोरामधील नागबेरन त्राल जंगल परिसरात दहशतवादी लपले असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली होती. त्यानुसार जम्मू-काश्मीर पोलिस आणि सैन्यदलांनी संयुक्त शोधमोहिम राबवली. जवानांनी दहशतवाद्यांना शरण येण्याचे आवाहन केले. यावेळी दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले यामध्ये जैश-ए-मोहम्मदचे तीन दहशतवादी ठार झाले.
यापूर्वी काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात खीवमध्ये गुरुवाती रात्री झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिदीनचे दोन दहशतवादी ठार झाले होते.
परिसरातील स्थानिक नागरिकांच्या हत्यामध्ये या दोघांचा सहभाग होता.तसेच ही कारवाई करताना परिसरातील स्थानिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले होते.
दोघांकडून एके ४७ रायफल, एक पिस्तुलसह आक्षेपार्ह साहित्य जप्त केले होते.
दहशतवाद्यांचा खात्मा केल्याने स्थानिक नागरिकांमधील दहशत कमी होईल, असा विश्वास सुरक्षा दलाच्या प्रवक्त्यांनी व्यक्त केला होता.
मागील काही दिवस जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाने धडक कारवाई केली आहे. या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांमधील असणारी दहशत कमी हाेत आहे.
हेही वाचलं का ?