प्रातिनिधिक छायाचित्र.  Pudhari
राष्ट्रीय

Jail Tourism | गुन्हा नाही, तरीही जेलची हवा! कारागृहाची अजब 'फील द जेल' ऑफर!

जेल म्युझियमसह 'तुरुंग अनुभव' उपक्रमांतून मिळणारे पैसे जमा होणारा कैद्यांच्या कल्याण निधीत

पुढारी वृत्तसेवा

telangana prison department tourism

हैदरबाद : तुरुंग म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतात त्या उंचच उंच भिंती, कडेकोट पहारा आणि गुन्हेगारांचे एक भीषण जग! सर्वसामान्यांनी हे जग आजवर फक्त चित्रपटांच्या पडद्यावरच पाहिलंय असतं. येथे फक्त गुन्हा केल्यावरच प्रवेश मिळतो. येथे पाऊल ठेवताच स्वतःचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं जातं', अशी ही भीतीदायक जागा; पण मानवी स्वभाव मोठा विचित्र आहे! ज्या गोष्टी करू नका असं म्हटलं जातं, तिथेच उत्सुकतेपोटी डोकावून पाहण्याची माणसाला सवय असते. म्हणूनच, 'तुरुंगाच्या आतलं जग नेमके कसं असेल?' या कुतूहलातून हैदराबादमधील चंचलगुडा मध्‍यवर्ती तुरुंगाने 'फील द जेल' ऑफर सुरु केली आहे.

चंचलगुडा जेलमध्ये २४ तास घेता येणार 'तुरुंगाचा अनुभव'

हैदराबादमधील तुरुंगाने चक्‍क 'फील द जेल' ऑफर पर्यटकांनासाठी दिली आहे. शहरातील चंचलगुडा मध्यवर्ती तुरुंगाने ('फील द जेल' (Feel the Jail) ही ऑफर सुरू केली आहे. ही ऑफर अशी आहे की, नागरिक केवळ दोन हजार रुपये भरुन तुरुंगाच्या कोठडीत २४ तास घालवू शकतात. जर कोणाला कमी वेळ राहायचे असेल, तर २ तासांचा अनुभवही एक हजार रुपयांमध्‍ये उपलब्‍ध करुन देण्‍यात आला आहे.

पर्यटकांसाठी ठरणार खास 'तुरुंगवारी '

हैदराबात शहरातील चंचलगुडा या मध्यवर्ती तुरुंगाने फिल द जेल ही ऑफर दिली आहे. यामध्‍ये तुरुंगाचे सुंदर सजवलेले प्रवेशद्वार एका अरुंद पॅसेजमध्ये उघडते, जिथे दोन्ही बाजूंना तुरुंगाच्या बराकी आहेत. एका खोलीत पांढऱ्याशुभ्र भिंतीसमोर नेव्ही-ब्लू चादर असलेला एक सिंगल बेड आहे. सोबतच पिण्याच्या पाण्यासाठी एक मातीचे माठ आणि एक छोटी वॉशरुमची जागा देण्यात आली आहे. दुसऱ्या एका खोलीत समोरासमोर चार बेडची व्यवस्था आहे, तर आणखी एका खोलीला लोखंडी जाळ्यांचे दुहेरी थर लावण्यात आले आहेत, जेणेकरून हालचालींवर आणि बाहेर पाहण्यावर मर्यादा येतील.

चंचलगुडा जेल म्युझियम

चंचलगुडा जेल म्युझियममध्ये प्रवेश करण्यासाठी विद्यार्थ्यांना १० रुपये आणि इतर पर्यटकांसाठी २० रुपये शुल्क ठेवण्यात आले आहे, १० वर्षांखालील मुलांना मोफत प्रवेश दिला जाईल. या संग्रहालयामध्ये जुनी शिक्षा देण्याची साधने, दुर्मिळ वस्तू आणि ऐतिहासिक दालने पाहायला मिळतात. हे प्रदर्शन ब्रिटिश (वसाहतवादी) काळातील तुरुंगवासाची आठवण करून देते आणि पूर्वीच्या काळी कैद्यांना कशा प्रकारे तीव्र शारीरिक आणि मानसिक यातना सहन कराव्या लागत असत, याचे दस्तऐवजीकरण येथे केले आहे.

१२ मे पासून उपक्रम सुरु

तेलंगणा तुरुंग विभागाने १२ मे २०२६ रोजी हा उपक्रम सुरू केला आहे. नागरिकांना प्रत्यक्ष तुरुंगाचा अनुभव मिळावा यासाठी खास डिझाइन केलेल्या बराकींमध्ये कैद्यांसारखे राहणे, तुरुंगातील जेवण खाणे, कडक नियमांचे पालन करणे आणि मर्यादित हालचालींची शिस्त अनुभवण्याची संधी यातून दिली जात आहे.

यापूर्वी सरकारने केला होता 'हेरिटेज जेल म्युझियम'चा प्रयोग

अशाच प्रकारचा प्रयोग यापूर्वी सरकारने संगारेड्डी येथील 'हेरिटेज जेल म्युझियम'मध्ये काही काळासाठी सुरू केला होता. तेलंगणाच्या तुरुंग महासंचालक सौम्या मिश्रा यांच्या मते, काही वर्षांपूर्वी संगारेड्डी येथील जेल म्युझियम कोसळल्यानंतर, त्यांनी या संकल्पनेचे पुनरुज्जीवन करून चंचलगुडा येथे एक आधुनिक आणि प्रत्यक्ष अनुभव देणारे संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला.जेल म्युझियम आणि 'तुरुंग अनुभव' या दोन्ही उपक्रमांतून जमा होणारा निधी कैद्यांच्या कल्याण आणि विकास निधीसाठी वापरला जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT