jagannath temple birds on the dome temple puri orissa could be an inauspicious signs
पुढारी ऑनलाईन
पुरी येथील जगन्नथ मंदिर हे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत आहे. या ठिकाणी होणाऱ्या जगन्नाथ रथ यात्रेत लोक आपल्या हाताने भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि माता रूम्ण्णीचा रथ ओढतात. हा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी जगभरातून लाखो भाविक येथे हजेरी लावतात. या ठिकाणी अनेक चमत्कारिक गोष्टी घडत असल्याची भक्तांमध्ये धारणा आहे. अशीच एक घटना समोर आली आहे. त्या विषयी जाणून घेऊयात.
पुरी येथील जगन्नाथ मंदिराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पक्ष्यांचा एक थवा मंदिराच्या शिखराभोवती उडताना दिसत आहे. काही लोक याला अशुभ संकेत मानत आहेत, तर मंदिर प्रशासनाने ही एक सामान्य घटना असल्याचे सांगितले आहे.
ओडिशातील पुरी येथील जगन्नाथ मंदिराचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पक्ष्यांचा एक थवा मंदिराच्या शिखरावर घिरट्या घालताना दिसतो. काही लोक ही घटना दुर्मिळ असल्याचे सांगत असून तिला एका पौराणिक ग्रंथ ‘भविष्य मालिका’ मधील भविष्यवाणीसोबत जोडून पाहत आहेत. त्यांचा असा विश्वास आहे की, हे दृश्य भविष्यात घडणाऱ्या एखाद्या अशुभ घटनेचा संकेत आहे. मात्र मंदिर प्रशासनाने याला पूर्णपणे नैसर्गिक आणि सामान्य घटना असल्याचे स्पष्ट केले आहे. 2026 च्या सुरुवातीच्या काही दिवस आधी ही घटना अचानक लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.
भविष्य मालिका म्हणजे काय?
भविष्य मालिका हा 15व्या–16व्या शतकात लिहिला गेलेला ओडिशातील एक प्रसिद्ध ग्रंथ आहे. हा ग्रंथ अच्युतानंद दास आणि इतर पाच संतांनी लिहिला असून, यात कलियुगाच्या अंताबाबत विविध भविष्यवाणी करण्यात आलेल्या आहेत. या ग्रंथातील एक श्लोक पुढीलप्रमाणे आहे.
"नीलाचल छाड़ि आम्भे जिबु जेतेबेले
लागिब रत्न चांदुआ अग्नि सेते बेले
निशा काले मन्दिररु चोरी हेब
हेले बड़ देऊलुमोहर खसिब पत्थर
बसिब जे गृध्र पक्षी अरुण स्तम्भर
बातास रे बक्र हेब नीलचक्र मोर"
या श्लोकाचा अर्थ असा आहे
“जेव्हा मी नीलाचल सोडून जाईन, तेव्हा माझ्या रत्नजडित सिंहासनावरील छत्रात आग लागेल. श्रीमंदिराच्या परिसरात मध्यरात्री चोरी होईल आणि मंदिराच्या शिखरावरून दगड कोसळतील. वादळामुळे नीलचक्र वाकडे होईल आणि अरुण स्तंभावर गिधाड येऊन बसेल.”
गरुडाच्या घिरट्या अन्
उल्लेखनीय म्हणजे, याच वर्षी एप्रिल महिन्यात एक गरुड जगन्नाथ मंदिराच्या शिखरावर असलेला ध्वज उचलून आपल्या पंज्यात पकडून मंदिराची प्रदक्षिणा घालत असल्याचा प्रसंग समोर आला होता. हे दृश्य पाहून स्थानिक लोकांमध्ये खळबळ उडाली होती. अनेकांनी यालाही अपशकुन मानले होते. तर काही लोकांचे म्हणणे होते की, गरुड ज्या ध्वजाला घेऊन उडत होता, तो जगन्नाथ मंदिराचा नव्हता. त्या वेळीही मंदिरातील पुजाऱ्यांनी ही घटना नैसर्गिक आणि सामान्य असल्याचे सांगितले होते.