NISAR satellite launch Pudhari
राष्ट्रीय

NISAR satellite launch | इस्रो-नासा यांचा 13000 कोटींचा उपग्रह अवकाशात झेपावला; पृथ्वीचे हाय रिझोल्युशन निरीक्षण शक्य

NISAR satellite launch |हवामान, भूकंप, शेती आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी फायदेशीर ठरणार

Akshay Nirmale

NISAR satellite launch

श्रीहरीकोटा : भारत आणि अमेरिका यांच्यातील अंतराळ सहकार्याचा एक महत्त्वाचा टप्पा आज गाठण्यात आला आहे. ISRO (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) आणि NASA (नॅशनल एरोनॉटिक्स अ‍ॅण्ड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन) यांनी संयुक्तपणे विकसित केलेला 'NISAR' (NASA-ISRO Synthetic Aperture Radar) उपग्रह आज सायंकाळी 5.40 वाजता श्रीहरिकोटा येथून यशस्वीरित्या अंतराळात झेपावला.

या उपग्रहाचा प्रक्षेपण GSLV-F16 रॉकेटद्वारे दुसऱ्या प्रक्षेपणस्थळावरून करण्यात आला. या प्रक्षेपणामुळे पृथ्वीवरील विविध नैसर्गिक बदलांचे हाय-रिझोल्यूशन निरीक्षण शक्य होणार असून हवामान बदल, आपत्ती व्यवस्थापन, शेतीमधील पॅटर्न आणि समुद्रकिनाऱ्यांवरील बदल यांचा अभ्यास अधिक अचूकपणे करता येणार आहे.

NISAR विषयी महत्त्वाचे मुद्दे

उपग्रहाचे वजन: 2393 किलो

कक्षा: सूर्यसमकालीन ध्रुवीय कक्षा (Sun-synchronous polar orbit)

रडार प्रणाली: NASA कडून L-बँड आणि ISRO कडून S-बँड

तंत्रज्ञान: SweepSAR – जो प्रत्येक 12 दिवसांनी पृथ्वीवरील भूभाग, हिमप्रदेश व समुद्राचा तपशीलवार नकाशा तयार करू शकतो

कार्यकाल: किमान 5 वर्षे

विशेष बाब: GSLV रॉकेटद्वारे प्रथमच सूर्यसमकालीन कक्षेत उपग्रह पाठवण्यात आला आहे, जी यापूर्वी प्रामुख्याने PSLV ने हाताळली जात होती.

उपग्रहाचे उद्दिष्ट

NISAR उपग्रह पृथ्वीवरील नैसर्गिक क्रिया जसे की हिमनद्या सरकणे, वनोंत्पाटन (deforestation), भूकंप, जमिनीवरील हालचाली, तसेच शेती व जलविज्ञान यांच्यावर लक्ष ठेवेल. या डेटाचा वापर हवामान बदलाच्या प्रभावांचा अभ्यास करण्यासाठी तसेच आपत्ती व्यवस्थापनात वेगवान निर्णय घेण्यासाठी होणार आहे.

प्रक्षेपणानंतरचे टप्पे

उपग्रह आता In-Orbit Checkout या प्रारंभीच्या टप्प्यात आहे, जो पुढील 90 दिवस चालेल. या काळात सर्व उपकरणे व प्रणालींची चाचणी केली जाईल आणि त्यानंतर वैज्ञानिक निरीक्षण सुरू होईल.

भारत-अमेरिका अंतराळ सहकार्याचा महत्त्वाचा टप्पा

या प्रकल्पासाठी दोन्ही देशांमध्ये मागील दशकभरात तांत्रिक देवाण-घेवाण, यंत्रसामग्री निर्मिती आणि वैज्ञानिक सहकार्य झाले आहे. ISRO ने उपग्रह व प्रक्षेपण यंत्रणा तयार केली असून NASA ने L-बँड रडार, उच्चगती डेटा लिंक व GPS रिसीव्हर पुरवले आहेत.

दोन्ही संस्था या उपग्रहाची माहिती संकलित करण्यासाठी पृथ्वीवरील ग्राउंड स्टेशनद्वारे कार्य करणार आहेत.

ऐतिहासिक...

क ही GSLV ची 18 वी उड्डाण मोहीम असून त्यातील 12 वी स्वदेशी क्रायोजेनिक टप्पा असलेली रॉकेट उड्डाण आहे. तसेच, श्रीहरिकोटा येथून करण्यात आलेले हे 102 वे प्रक्षेपण आहे. NISAR मिशनमुळे केवळ विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातच नव्हे, तर जागतिक हवामान निरीक्षण, पर्यावरण संवर्धन आणि मानवी जीवनाच्या सुरक्षेसाठीही नव्या शक्यता निर्माण झाल्या आहेत.

13000 कोटींचा खर्च

निसार उपग्रहाचा एकूण खर्च अंदाजे 1.5 बिलियन डॉलर्स (सुमारे 12,500 कोटी रुपये) इतका आहे. हे सर्वात महागड्या पृथ्वी निरीक्षण मिशनपैकी एक आहे

यातील अंदाजे 1.2 बिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 10,000 कोटी रुपये एवढी रक्कम NASA कडून खर्च करण्यात आहे. या मध्ये L‑band SAR, रडार इलेक्ट्रॉनिक्स, GPS रिसीव्हर्स, रडार अँटेना आणि अभियांत्रिकी समर्थनाचा समावेश आहे

तर भारताच्या ISRO चा वाटा यात 788 कोटी रुपयांचा आहे. यात S‑band SAR, सॅटेलाइट बस, प्रक्षेपण यंत्रणा (GSLV‑F16), ग्राउंड स्टेशन आणि संचालन समाविष्ट आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT