Investment Plans Post Office Scheme:
जर तुम्ही तुमचे पैसे दुप्पट करणारी योजना शोधत असाल, तर तुमचा शोध आज संपणार आहे. ही योजना अनेकांना माहीत नाही, जी तुमच्या पैशाच्या दुप्पट होण्याची हमी देते. गुंतवणूकदारांचे पैसे शंभर टक्के सुरक्षित राहतात. तुम्ही फक्त एक हजार पासून यामध्ये गुंतवणूक करू शकता. जाणून घ्या काय आहे ही योजना?
पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध असलेल्या या योजनेला किसान विकास पत्र म्हणतात. कोणताही भारतीय नागरिक किसान विकास पत्र खाते उघडू शकतो. तसेच जास्तीत जास्त तीन लोक एकत्र खाते उघडू शकतात. यामध्ये दोन प्रकारची संयुक्त खाती आहेत.
जॉईंट A : या प्रकारच्या खात्याचे व्यवहार चालवण्यासाठी सर्व गुंतवणूकदारांना एकत्र स्वाक्षरी करणे किंवा संमती देणे आवश्यक असते. जर एखाद्याचा मृत्यू झाला, तर उर्वरित लोक मिळून ते खाते चालवू शकतात.
जॉईंट B : यामध्ये कोणत्याही एका खातेधारकाला खात्याचा वापर करण्याची परवानगी असते. म्हणजेच, सर्वांना एकत्र येण्याची गरज नसते. जर एखादा गुंतवणूकदार नसेल, तरी उर्वरित लोक वेगवेगळे देखील ते चालवू शकतात.
किसान विकास पत्र खाते ७.५ टक्के चक्रवाढ व्याजदर देते. तुम्ही या योजनेत १,००० रूपये इतकी कमी गुंतवणूक करू शकता. या खात्याची सर्वात खास गोष्ट म्हणजे, ते तुम्ही मुदतीपूर्वी देखील बंद करू शकता.
किसान विकास पत्र ही भारत सरकारची एक लहान बचत योजना आहे. ती १९८८ मध्ये सुरू करण्यात आली होती आणि नंतर २०१४ मध्ये पुन्हा लॉन्च करण्यात आली. याचा उद्देश लोकांना दीर्घकालीन बचत आणि सुरक्षित गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन देणे हा आहे. तुम्ही पोस्ट ऑफिस आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधून या योजनेत पैसे गुंतवू शकता.