न्यूयॉर्क : वृत्तसंस्था : इंटरनेटबंदीत भारत सलग ५ व्या वर्षी जगात पहिला ठरला आहे. गतवर्षी (२०२२) जगात विविध देशांत मिळून एकूण १८७ वेळा इंटरनेटवर बंदी घालण्यात आली होती. त्यात ८४ वेळेची बंदी एकट्या भारतात घालण्यात आली होती. भारतात सर्वाधिक ४९ वेळा इंटरनेट बंदी लागू करण्याचा प्रसंग एकट्या काश्मीरमध्येच ओढविला. न्यूयॉर्कमधील डिजिटल अधिकार वकिली गट अॅक्सेस नाऊने याबाबतचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. गेल्या ५ वर्षांत दरवषी इंटरनेट बंदीच्या प्रसंगांनी १०० पर्यंत मजल गाठलेली आहे. २०२३ मध्ये पहिल्यांदा हा आकडा १०० च्या खाली आला आहे. (Internet )
यादीत युक्रेन दुसऱ्या, तर इराण तिसऱ्या क्रमांकावर आहेत. २४ फेब्रुवारी २०२२ रोजी रशियाने हल्ला केल्यानंतर रशियन सैन्याने
युक्रेनमधील इंटरनेट कनेक्शन २२ वेळा कापले. इराणमध्ये हिजाब बंदीविरोधात आंदोलन पेटल्यानंतर २०२२ मध्ये प्रशासनाने १८ वेळा इंटरनेट बंद केले.
हेही वाचा