Actress Veena Kapoor : इंटरनेटवर सर्च करून आईच्या मृतदेहाची लावली विल्हेवाट, वीणा कपूरची मर्डर मिस्ट्री उघड | पुढारी

Actress Veena Kapoor : इंटरनेटवर सर्च करून आईच्या मृतदेहाची लावली विल्हेवाट, वीणा कपूरची मर्डर मिस्ट्री उघड

पुढारी ऑनलाईन डेस्क : ७४ वर्षीय ज्येष्ठ अभिनेत्री वीणा कपूर यांचा खून करून त्यांचाच मुलगा सचिनने मृतदेहाची इंटरनेटवर पाहून विल्हेवाट लावल्याचे उघड झाले आहे. वीणा कपूर आपला मुलगा सचिनसह जुहूमधील एका फ्लॅटमध्ये राहत होत्या. (Actress Veena Kapoor) ६ डिसेंबर २०२२ रोजी त्यांचा ४३ वर्षांचा मुलगा सचिनने आपल्या आईचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी इंटरनेटवर सर्च केल्याचा उलगडा झाला आहे. मुंबईजवळील एका टेकडीवरून वीणा यांचा मृतदेह त्याने फेकून दिला. सीसीटीव्ही कॅमेरा आणि डीव्हीआरच्या डिव्हाईसमध्ये त्याने आपल्या आईवर बेसबॉलच्या बॅटने हल्ला केला. असे पोलिसांनी ४२० पानांच्या आरोपत्रामध्ये म्हटले आहे. (Actress Veena Kapoor)

“वीणा बेडरूममध्ये उठण्याचा प्रयत्न करत असताना सचिनने त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला. सचिनने रागाच्या भरात त्यांच्यावर बेसबॉलच्या बॅटने वार केले, ज्यामुळे त्यांचा तत्काळ मृत्यू झाला,” असे आरोपपत्रात म्हटले आहे. त्यानंतर त्याने मृतदेह पॅक केला. एका कड्यावर जाऊन सायंकाळी नेरळ-माथेरान रोडवरील ३० फूट दरीत टाकले. सीसीटीव्ही कॅमेरामध्ये हा धक्कादायक प्रकार कॅमेराबद्ध झाला आहे.

घरच्या कामात मदत करणारा २५ वर्षांचा लालूकुमार मंडल हाने देखील या गुन्ह्यात सामील आहे. त्याने वीणा यांच्या बेडरुममधील १० सीसीटीव्ही कॅमेरा आणि डीव्हीआर हटवले आहेत. तसेच सर्व फ्लॅट स्वच्छ केला. नंतर ते पनवेल येथे जाऊन सचिनला भेटला. ते माथेरान-नेरळल गेले. तेथून मृतदेह आणि खुन्यातील वस्तू ३० फूट खोल दरीत फेकून दिल्या.

या मर्डर मिस्ट्रीबद्दल तपास अधिकारी म्हणतात- “डीव्हीआर आणि सीसीटीव्ही कॅमेरा हे या प्रकरणातील ठोस पुरावे आहेत. कारण त्यामध्ये सचिनने त्याच्या आईवर अनेक वेळा वार करतानाचे फुटेज आहेत. बेडरूमच्या दाराच्या मागून रक्ताने माखलेला बेसबॉल जप्त करण्यात आला आहे,” असे आरोपपत्रात म्हटले आहे.

४१ साक्षीदारांचे जबाब, फॉरेन्सिक आणि शवविच्छेदन अहवाल, रक्ताने माखलेली बेसबॉल बॅट, वीणाचा मोठा मुलगा नेविन याचा जबाब, टोल कर्मचाऱ्यांचा जबाब नोंदवण्यात आले आहेत. सचिनच्या कारचे कर्टन घेऊन माथेरानला जाणाऱ्या टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज आहेत.

 

Back to top button