Internet Explorer : मायक्रोसॉफ्टचे नवे अपडेट; इंटरनेट एक्सप्लोरर झाले बंद! | पुढारी

Internet Explorer : मायक्रोसॉफ्टचे नवे अपडेट; इंटरनेट एक्सप्लोरर झाले बंद!

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंटरनेट एक्सप्लोरर गेली 27 वर्ष जगभरातील नेटकऱ्यांचा एक भाग बनला होता. 1995 मध्ये इंटरनेट एक्सप्लोरर (Internet Explorer) हे ब्राऊझर सुरु करण्यात आलं होते. मायक्रोसॉफ्ट कंपनीन (Microsoft) हे वेब ब्राऊझर आता बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार 14 फेब्रुवारीपासून हे सर्वात जुने ब्राऊजर निष्क्रीय करण्यात आले आहे.

मायक्रोसॉफ्ट कंपनीने जाहीर केले आहे की, कंपनीचा आउट-ऑफ-सपोर्ट वेब ब्राउझर इंटरनेट एक्सप्लोरर (Internet Explorer) त्याच्या मागील पिढीच्या विंडोज 10 ऑपरेटिंग सिस्टमच्या सॉफ्टवेअर अपडेटद्वारे कायमचा बंद केला जाईल. म्हणजेच, यानंतर, विंडोज 10 ऑपरेटिंग सिस्टम असलेल्या सर्व लॅपटॉप आणि संगणकांवर इंटरनेट एक्सप्लोरर वापरता येणार नाही.

मायक्रोसॉफ्ट एज अपडेट

मायक्रोसॉफ्ट एजमध्ये IE मोड स्थापित करण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे आता IE11 हे बंद होणार आहे. जेणेकरून एखाद्या संस्थेला व्यावसायिक समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. म्हणजेच, 14 फेब्रुवारीपासून हे युजर्स इंटरनेट एक्सप्लोरर 11 (IE11) डेस्कटॉप अॅप्लिकेशनऐवजी मायक्रोसॉफ्ट एज (Microsoft Edge) मोड वापरात येणार आहे.

मायक्रोसॉफ्ट एजच्या नवीन अपडेटद्वारे, इंटरनेट एक्सप्लोरर 11 ( IE11) हे Windows 10 या संगणक प्रणालीवर बंद केले जाईल. कंपनीकडून विंडोज अपडेट्स रिलीझ करण्यात येईल असे यापूर्वी जाहीर करण्यात आले होते, परंतु आता मायक्रोसॉफ्टचे म्हणणे आहे की एज अपडेटद्वारे सॉफ्टवेअर बंद करण्याचा निर्णय संस्थांना उर्वरित इंटरनेट एक्सप्लोरर 11 वापरकर्त्यांना मायक्रोसॉफ्ट एजमध्ये सहजतेने स्थलांतरित करण्यात मदत करण्यासाठी घेण्यात आला आहे.

जाणून घ्या इंटरनेट एक्सप्लोररचा आतापर्यंतचा प्रवास

2000 सालानंतर त्याच्या वापरकर्त्यांची संख्या झपाट्यानं वाढली. 2003 मध्ये या वेब ब्राउझर मार्केट शेअर जवळपास 95 टक्क्यांपर्यंत वाढला होता. जगभरातील जवळजवळ प्रत्येकजण इंटरनेट एक्सप्लोरर वापरत होता. पुढे गुगल क्रोम, फायरफॉक्स असे ब्राउझर बाजारात आले. त्यांच्या तुलनेत इंटरनेट एक्सप्लोरर स्वतःला अपडेट करू शकला नाही आणि बाजारात मागे पडला. त्यानंतर हळूहळू लोकांनी इंटरनेट एक्सप्लोरर वापरणं बंद केल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत होते. आता मात्र हे जुने ब्राऊजर कायमस्वरुपी बंद झाले आहे.

हेही वाचा

Back to top button