inside water tank viral youtuber video water tower exploration
पुढारी ऑनलाईन : सध्याचा काळ हा सोशल मीडियाचा आहे. त्यामुळे एखादी घटना सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होउ शकते. त्यामुळे अनेक यूटयूबर्स नवनवे विषय शोधून आपले व्हिडिओचे व्ह्यूज वाढवण्याचा प्रयत्न करत असतात. असाच एक व्हिडिओ म्हणा किंवा प्रयोग चर्चेत आला आहे.
सोशल मीडियावर पाण्याच्या मोठ्या टाक्यांशी संबंधित अनेक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. या व्हिडिओंमध्ये काही यूट्यूबर्स पाण्याच्या टाकीच्या आत जाऊन चित्रीकरण करताना दिसत आहेत.
तुम्ही यूट्यूबवर घरांच्या किंवा गावांच्या परिसरातील मोठ्या पाण्याच्या टाक्यांबद्दल शोध घेतला, तर अशा अनेक व्हिडिओंचा खजिना सापडेल. काही यूट्यूबर्स टाकीच्या माथ्यावर चढून तेथून दिसणारे सुंदर दृश्य दाखवतात, तर काहीजण थेट टाकीच्या आत उतरून तेथे पाण्याव्यतिरिक्त आणखी काय असते, याची माहिती देतात. त्यामुळे या व्हिडिओंना इतके व्ह्यूज कसे मिळतात, याची उत्सुकता अनेकांना लागली आहे.
यूट्यूबर्स व्ह्यूज कसे मिळवत आहेत?
यूट्यूबर्स सर्वप्रथम टाकीवर चढण्याचा संपूर्ण प्रवास दाखवतात. त्यानंतर टाकीच्या सर्वोच्च भागावर पोहोचून तेथून दिसणारे गाव, शहर किंवा परिसराचे विहंगम दृश्य प्रेक्षकांना दाखवतात. अशा प्रकारचे व्हिडिओ यूट्यूबवर मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत आणि त्यांना लाखो व्ह्यूज मिळत आहेत.
काही धाडसी यूट्यूबर्स तर टाकीच्या आतही उतरले आहेत. त्यांनी टाकीच्या आतील रचना, पाण्याची साठवण व्यवस्था आणि तेथील परिस्थिती कॅमेऱ्यात कैद करून प्रेक्षकांसमोर आणली आहे. अशा अनेक व्हिडिओंना तब्बल ६ कोटींहून (60 मिलियन) अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
एका लोकप्रिय व्हिडिओमध्ये एक व्यक्ती पाण्याच्या टाकीच्या माथ्यावर जाऊन ड्रोनच्या मदतीने परिसराचे आकर्षक दृश्य दाखवताना दिसतो. या व्हिडिओला प्रेक्षकांनी मोठी पसंती दिली असून त्याच्या शॉर्ट्स व्हर्जनलाही लाखो-कोट्यवधी व्ह्यूज मिळाले आहेत.
एकूनच काय तर आपल्या व्हिडिओला व्ह्यूज मिळवण्यासाठी यूट्यूबर्स असे नवनवे विषय समोर आणत असतात. पण अशा प्रकारे व्हिडिओ करण्यासाठी अशा लोकांना परवानगी असतेच असे नाही. बरेच यूट्यूबर्स जीव धोक्यात घालून असे व्हिडिओ बनवत असतात. कोणतीही परवानगी न घेता असे व्हिडिओज शूट केले जातात.
त्यामुळे या गोष्टीची कोणालाही कल्पना नसते. परिणामी असा व्हिडिओ शूट करताना कोणतीही अप्रिय घटना घडली तर त्याचीही कल्पना कोणाला मिळण्याची शक्यता कमीच असते. त्यामुळे अशा लोकांनी व्हिडिओ करताना एखाद्या गोष्टीची माहिती लोकांसमोर आणावी मात्र ते करताना स्वत:च्या सेफ्टीचीही तितकीच काळजी घेणे गरजेचे आहे.