Crime News file photo
राष्ट्रीय

Crime News: एमबीए विद्यार्थिनीचे अश्लील व्हिडिओ आणि निर्वस्त्र मृतदेह, प्रियकरानेच गळा आवळून केली हत्या! कारण धक्कादायकच

Indore MBA student murder: एका भाड्याच्या खोलीत २४ वर्षीय एमबीए विद्यार्थिनीचा निर्वस्त्र मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

मोहन कारंडे

इंदूर: येथील एका भाड्याच्या खोलीत २४ वर्षीय एमबीए विद्यार्थिनीचा निर्वस्त्र मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. पीडितेच्या गळ्यावर दोरीच्या खुणा आढळल्या असून तिची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. तिचा प्रियकर आणि वर्गमित्र पीयूष धामनोदिया हा या घटनेनंतर फरार झाला आहे.

नेमकी घटना काय?

पीडित तरूणी एमबीएच्या दुसऱ्या सत्रात शिकत होती. गेल्या चार दिवसांपासून ती बेपत्ता होती. ११ फेब्रुवारी रोजी ती तिच्या वडिलांसोबत जन्म दाखल्यातील दुरुस्तीसाठी गेली होती. त्यानंतर त्याच रात्री एका मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला जाते असे सांगून ती घरातून बाहेर पडली, पण पुन्हा परतलीच नाही. ती घरी न परतल्याने तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

शुक्रवारी अंकल गल्ली येथे मंदसौर येथील रहिवासी पीयूष धामनोदिया याने भाड्याने घेतलेल्या खोलीत पोलिसांना मृतदेह आढळला. तिच्या गळ्यावर दोरीने गळा आवळल्याच्या खुणा आढळल्या आहेत. धक्कादायक म्हणजे, मुलीच्या पायातील मोज्यांवरून वडिलांनी तिची ओळख पटवली.

आक्षेपार्ह व्हिडीओ कॉलेजच्या ग्रुपवर पोस्ट

त्याच रात्री तिच्या कॉलेजच्या अधिकृत व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपवर तिचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. या व्हिडीओमध्ये संशयित आरोपीने स्वतःचा चेहरा इमोजीने लपवला होता; मात्र तरुणीची ओळख स्पष्ट दिसत होती. हा व्हिडीओ केवळ ग्रुपवरच नाही, तर तरुणीचा मोबाईल वापरून तिच्या स्टेटसवर आणि संपर्कातील इतर लोकांनाही पाठवण्यात आला होता.

कॉलेजच्या फीसाठी ब्लॅकमेलिंगचा आरोप

पीडितेच्या वडिलांनी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत खळबळजनक आरोप केले आहेत. मुलीचा वर्गमित्र पीयूष धामनोदिया याने तिचे काही अश्लील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केले होते. या व्हिडिओच्या आधारे तो तिला वारंवार ब्लॅकमेल करत होता. एवढेच नव्हे, तर स्वतःच्या कॉलेजची फी भरण्यासाठी तो तिच्यावर पैशांचा दबाव टाकत होता. या त्रासामुळे ती गेल्या काही दिवसांपासून तीव्र नैराश्यात होती, असे वडिलांनी सांगितले.

आरोपीचा शोध सुरू

अंकल गली येथे फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले असून आरोपीला पकडण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. आरोपी पीडितेचा वर्गमित्र होता आणि त्यांच्यात प्रेमसंबंध होते. शवविच्छेदन अहवाल आणि फॉरेन्सिक विश्लेषणानंतर हत्येचे नेमके कारण आणि घटनाक्रम अधिक स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT