आंतरराष्ट्रीय शूटर आशिष
आशिषला इंदूरला पोहचणं होत म्हत्वाचं
वडिलांनी लगेचच गाडीला स्टार्टर मारला
बाप राहिला खंबीर
Emotional travel story: देशभरातील विमानतळावर इंडिगोच्या फ्लाईट्स रद्द झाल्यामुळं हाहाकार माजला होता. हजारो प्रवासी हे विमानतळावर अडकून पडले होते. याच इंडिगो क्रायसेसमध्ये हरियाणाच्या रोहतन जिल्ह्यात राहणाऱ्या पंघाल कुटुंबीय देखील अडकले होते. त्यांना देखील खूप मनःस्ताप सहन करावा लागला. फ्लाईट रद्द झाल्यामुळं त्यांच्या मुलाची आगामी परीक्षा आणि शाळेतील त्याचा सन्मान सोहळा या दोन्हीला मुकावं लागण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र वडिलांनी आपल्या मुलाच्या आनंदावर इंडिगोला पाणी फेरू दिली नाही.
मायना गावाचा तरूण आंतरराष्ट्रीय शूटर आशिष चौधरी पंघाल हा इंदूरच्या प्रतिष्ठित डेली कॉलेजमध्ये १२ वीत शिकत आहे. तो परीक्षेपूर्वी काही दिवस सुट्टीसाठी घरी आला होता. त्याचा ६ डिसेंबर रोजी रात्री शाळेत एक सन्मान सोहळा देखील होणार होता. त्यामुळं तो विमानानं इंदूरसाठी रवाना होणार होता. त्याचबरोबर त्याची बोर्ड पूर्व परीक्षा देखील ८ डिसेंबरपासून सुरू होणार होती. १२ वीचं महत्वाचं वर्ष असल्यानं या परीक्षेला उपस्थित राहणं गरजेचं होतं.
आशिषला दोन्ही कार्यक्रमांना वेळेत पोहचणं गरजेचं होतं. त्यासाठी आशिषचे वडील राजनारायण पंघाल हे त्याला दिल्लीच्या विमानतळावर सोडण्यासाठी आले होते. संपूर्ण कुटुंबच एअर पोर्टवर मुलाला बाय बाय करण्यासाठी पोहचलं होत. मात्र इंडिगोनं त्यांची घोर निराशा केली. त्यांची इंदूरची फ्लाईट अचानक रद्द झाली. अशि परिस्थिती निर्माण झाली की आशिष त्याच्याच सन्मान सोहळ्याला उपस्थित राहू शकणार नाही. तसेच तो परीक्षेला देखील मुकण्याची शक्यता निर्माण झाली.
याच्यावर उपाय काढण्यासाठी आशिषच्या वडिलांनी ट्रेनचे तात्काळचे तिकीट काढण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र त्यांना इंदूरसाठीचे तिकीटच मिळालं नाही. अशा परिस्थितीत हार न मानता वडील राजनारायण यांनी त्वरित गाडीतून इंदूर गाठण्याचा निर्णय घेतला.
दिल्ली ते इंदूरचे अंतर जवळपास ८०० किलोमीटरचं आहे. या प्रवासासाठी साधारणपणे १२ ते १४ तास लागतात. मात्र दृढनिश्चय केलेल्या वडिलांनी संध्याकाळी गाडीचा स्टार्टर मारला. त्यांनी रात्रभर गाडी चालवली. आलेल्या थकव्याकडं दुर्लक्ष केलं. त्यांचे एकच ध्येय होतं मुलाला त्याच्या सन्मान सोहळ्यात अन् आगामी परीक्षेला सुखरूप शाळेपर्यंत पोहचवायच! दुसऱ्या दिवशी सकाळी आशिष वेळेत शाळेत पोहचला. मुलाच्या आनंदासाठी अन् परीक्षेसाठी बाप खंबीर राहिला.